“MICTA Festival” Marathi Natya – Chitrapat Mahottsav now in Pune

महाराष्ट्र कलानिधी प्रस्तुत म्हैसकर ‘मिक्ता’ 2013 नाटय – चित्रपट महोत्सव यंदा पुण्यात

  • “MICTA” Marathi Natya – Chitrapat Festival Pune
  • Venue:
    • City Pride Kothrud-Pune,
    • Yashwantrao Chavan Natyagruha, Kothrud, Pune
  • Date: 1st Sep to 7th Sep 2013

मराठी चित्रपट व नाटयसृष्टीला आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख मिळवून देणारा मानाचा सोहळा म्हणजे म्हैसकर ‘मिक्ता’ पुरस्कार सोहळा. दरवर्षा परदेशात आयोजित होणा-या या पुरस्कार सोहळ्याचे हे चौथे वर्ष आहे. ‘महाराष्ट्र कलानिधी’ प्रस्तुत म्हैसकर ‘मिक्ता’ म्हणजेच ‘मराठी इंटरननॅशनल सिनेमा अँड थिएटर अवार्डस्’ सोहळ्याचे आयोजन यंदाही अभिनेता – दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या संकल्पनेतून होत आहे.

दरवर्षाप्रमाणे परदेशातील मुख्य सोहळ्याआधी ‘मिक्ता’ नाटक आणि चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून यंदा प्रथमच हा महोत्सव पुण्यात आयोजित होत आहे. 1 ते 7 सप्टेंबर दरम्यान आयोजित होणा-या महोत्सवासाठी प्राथमिक फेरीत निवडण्यात आलेल्या 10 नाटकांची आणि 10 चित्रपटांची नावे नुकतीच जाहीर करण्यात आली आहेत. पुण्यातील कोथरड येथील यशवंतराव चव्हाण नाटयगृहात ‘मिक्ता’ नाटय महोत्सव रंगणार असून ‘मिक्ता’ चित्रपट महोत्सवाचे आयोजन सिटी प्राईड कोथरड येथे करण्यात आले आहे.

‘म्हैसकर फाऊंडेशन’ आणि ‘महाराष्ट्र कलानिधी’ यांच्या संयुक्त विद्यमाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवामध्ये जास्तीत जास्त प्रेक्षकांनी सहभागी होऊन त्याचा आस्वाद घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

पुण्यात होणा-या ‘मिक्ता’ 2013 नाटय महोत्सवासाठी निवडण्यात आलेल्या 10 नाटकांची नावे –

  • प्रपोजल (Proposal)
  • गेट वेल सून
  • ठष्ट
  • डू अँडमी
  • एकदा पहावं न करन
  • फॅमिली ड्रामा
  • सुखान्त
  • ड्राय डे
  • उणे पुरे शहर एक
  • ती गेली तेव्हा

पुण्यात होणा-या ‘मिक्ता’ 2013 चित्रपट महोत्सवासाठी निवडण्यात आलेल्या 10 चित्रपटांची नावे-