वेबदुनियेत स्वप्नीलचा पहिलाच ‘समांतर’ प्रवास

Samantar Marathi Web Series Swapnil Joshi

मराठी सिनेसृष्टीत एका पेक्षा एक सुपरहिट कलाकृती देणारी दिग्दर्शक आणि अभिनेत्याची जोडी म्हणजे सतीश राजवाडे आणि स्वप्निल जोशी. लवकरच ही जोडी वेबसिरिजच्या निमित्ताने आपल्याला मनोरंजनाची एक दर्जेदार मेजवानी देणार आहेत. मालिका आणि चित्रपट या दोन्ही क्षेत्रात हिट ठरलेली ही जोडी, आता वेबदुनिया गाजवण्यासाठी सज्ज झाली आहे. लवकरच प्रदर्शित होणाऱ्या आणि एम एक्स ओरिजिनलची निर्मिती असणाऱ्या “समांतर” या वेबसिरीजमधून स्वप्नील जोशी वेबच्या दुनियेत पाय ठेवणार आहे.

“समांतर” या मराठी एम एक्स ओरिजिनल वेबसिरीजचे दिग्दर्शन सतीश राजवाडे यांनी केले असून, या वेबसिरीज मध्ये स्वप्नील जोशी सोबत तेजस्विनी पंडित सुद्धा दिसणार आहे. या वेबसिरीजमध्ये स्वप्नील कोणाचा तरी शोध घेत आहे. त्याचा या शोधाचे कथानक प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे आहे. ‘समांतर’ वेबसिरीजचा टिझर नुकताच प्रदर्शित झाला असून, येत्या ९ मार्चला या वेबसिरीजचा ट्रेलर प्रदर्शित होणार आहे.

Tags

samantar, samatar swapnil joshi mx,