‘नेबर्स’ चित्रपटाचे संगीत प्रकाशन आणि ट्रेलर लाँच

#NeighboursTrailer

सादर आहे #NeighboursTrailer रोशनच्या शेजारील फ्लॅट मध्ये प्रेरणा नावाची एक रहस्यमयी मुलगी रहायला येते आणि त्याचं संपूर्ण आयुष्यच बदलून टाकते. प्रेम आणि ताऱ्यांनी वेढलेल्या, एकाच मार्गाने प्रवास करणाऱ्या दोन शेजाऱ्यांची एक जगावेगळी प्रेम कथा . #Neighbours मराठी चित्रपट २० मार्च पासून सिनेमागृहात... #Neighbourshere ★ing Chetan Chitnis , Krutika Gaikwad , Siddharth Bodke , Prasad Jawade , Shailesh Datar , Neha Bamb , Aditi Yevale Directed By #VinayGholap Produced By #HiteshPatel Mithuwala Productions Presents A Kalpana Rolling Pictures Production Story, Screenplay and Directed by #VinayGholap Produced By #HiteshPatel DOP: Ashutosh Apte Lyricist : Mangesh Kangane Music & Background Score: Nishaad G Singers: @Nakash Aziz , Armaan Malik , Avadhoot Gupte , Ritika , Nishaad , Devarshri Manohar , Krishna Bongane Dialogue: Hrishikesh Koli & Vinay Gholap Casting Director: Shantanu Bhake Editor: Guru Patil, Mahesh Killekar VFX: Vishal Talkar (PRISCA) Sound: Dinesh Uchil & Shantanu Akerkar Choreographers: Aadesh Vaidya, Vrushali Chavan , Poonam Balam DI Bhushan Dalvi Post Production Studio: MITHUWALA Executive Producer: Rahul Bhosale PR: Pradnyaa Sumathi Shetty & Prem Jhangiani ( FRIENDS INCORPORATE ) Social Media Marketing : Abhijeet Edlabadkar Publicity Designs: Brijesh Kalyanji Dedhia #Marathi #Film #Movie #Trailer

Posted by MarathiStars.com on Thursday, March 5, 2020

‘मिठुवाला प्रौडक्शन्स’ आणि “कल्पना रोलिंग पिक्चर्स प्रौडक्शन’ निर्मित यांचे सादरीकरण असलेल्या ‘नेबर्स ” चित्रपटाचा संगीत प्रकाशन आणि ट्रेलर लाँच सोहळा नुकताच संपन्न झाला. निर्माते हितेश पटेल आणि दिग्दर्शक विनय श्रीरंग घोलप यांच्या या चित्रपटात एका तरुणीची गूढरम्य कहाणी चित्रित करण्यात आली आहे.

विज्ञान-तंत्रज्ञानाची कल्पनारम्य कथा असलेल्या या चित्रपटात चेतन चिटणीस, कृत्तिका गायकवाड, सिद्धार्थ बोडके, प्रसाद जावडे, शैलेश दातार, नेहा बंब, अदिती येवले आदी कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट येत्या २० मार्चला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.
दिग्दर्शक विनय घोलप यांचीच पटकथा असलेल्या या चित्रपटाचे संवाद हृषीकेश कोळी आणि विनय घोलप यांनी लिहिले आहेत तर
छायालेखनाची महत्वाची जबाबदारी कॅमेरामन आशुतोष आपटे यांनी सांभाळली आहे. गीतकार मंगेश कांगणे यांच्या गीतांना संगीतकार निषाद यांनी स्वरसाज चढविला आहे. पार्श्वसंगीतही त्यांनीच दिले आहे. गायक नकाश अजीज ,अरमान मलिक ,अवधूत गुप्ते ,रितिका निषाद ,देवश्री मनोहर ,कृष्णा बोंगाणे आहे.
श्री गुरु पाटील आणि महेश किल्लेकर यांनी संकलन केले असून चित्रपटाची तांत्रिक बाजू विशाल तालकर (व्हीएफएक्स), भूषण दळवी (डीआय), आणि दिनेश उचिल व शंतनू अकेरकर (ध्वनी-रेखन), अनुप देव आदी तंत्रज्ञांनी सांभाळली आहे. चित्रपटाचे कार्यकारी निर्माते राहुल भोसले असून कला दिग्दर्शन संजीव राणे यांनी केले आहे. शीतल पावसकर यांनी वेशभूषेची जबाबदारी सांभाळली आहे.