Ashok Patki releases music of Satish Rajwade’s ‘Popat’

`पोपट’ला अविनाश-विश्वजीत यांचे `रांगडया बाजा’तील संगीत

ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांच्या हस्ते झाले संगीत प्रकाशन

सतीश राजवाडे यांच्या `मुंबई-पुणे-मुंबई’ आणि `प्रेमाची गोष्ट’ या दोन रोमँटीक चित्रपटांना रोमँटीक बाजातील संगीत दिल्यानंतर
संगीत दिग्दर्शक अविनाश -विश्वजीत आता `पोपट’च्या चित्रपटाच्या माध्यमातून `रांगडा बाज’ मराठी प्रेक्षकांसमोर ठेवत आहेत.
आधीच्या दोन्ही चित्रपटांमधील रोमँटीक गाणी लोकप्रिय झाली आहेत आणि संगीत दिग्दर्शक जोडीचा हा `रांगडा बाज’ही रसिकांना
आवडेल असा विश्वास संगीत प्रकाशनाच्या वेळी व्यक्त केला गेला.

`पोपट’च्या रांगडया बाजातील संगीताचे प्रकाशन शनिवारी 10 ऑगस्ट 2013 रोजी ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांच्या
हस्ते झाले. शिवाजी पार्क येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या ऑडिटोरियममध्ये हा समारंभ पार पडला. 23
ऑगस्ट 2013 रोजी प्रदर्शित होत असलेल्या या चित्रपटातील गाणी स्वप्निल बांदोडकर, बेला शेंडे आणि पहिल्यांदाच मराठी
चित्रपटासाठी गाणारा प्रसनजीत कोसंबी तसेच मैथिली पेन्स-जोशी यांच्या आवाजात आहेत. हे सर्वच गायक या संगीत प्रकाशन
समारंभाला उपस्थित होते. चित्रपटात एकूण तीन गाणी आहेत.

’सतीश राजवाडे यांच्याबरोबर आम्ही याआधी केलेले दोन्ही चित्रपट हे रोमँटीक होते आणि त्यांचे संगीतही त्याच बाजाचे होते.
आमच्या त्या चित्रपटांतील संगीताला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या चित्रपटाच्या माध्यमातून अस्सल `रांगडा बाज’
पे्रक्षकांसमोर साजरा करत आहोत. तो सुध्दा प्रेक्षकांना भावेल. या चित्रपटात एकूण तीन गाणी आहेत आणि ती सर्वच झक्कास
जुळून आली आहेत,“ असे उद्गार संगीत प्रकाशन सोहळ्यात अविनाश–विश्वजीत यांनी काढले.“Popat” Music Launch- Photos

`पोपट’या नव्या मराठी चित्रपटात अतुल कुलकर्णा, अमेय वाघ, सिध्दार्थ मेनन आणि केतन पवार यांच्या भूमिका आहेत. सहाय्यक
कलाकारांमध्ये अनिता दाते, नेहा शितोळे आणि मेघा घाडगे यांचा समावेश आहे. चित्रपटाची पटकथा आणि संवाद चिन्मय केळकर
यांचे आहेत तर कथा सतीश राजवाडे यांची आहे. मिराह एन्टरटेन्मेंटने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. मिराह एन्टरटेन्मेंट आणि
सतीश राजवाडे यांनी `मुंबई-पुणे-मुंबई’, `प्रेमाची गोष्ट’ असे अनेक चित्रपट यशस्वीपणे दिले आहेत. आपल्या आगामी
`पोपट’बद्दलही दोघांना आत्मविश्वास आहे. कठोर मेहनत आणि संघभावना यांच्या माध्यमातून `प्रेमाची गोष्ट’नंतर केवळ पाचच
महिन्यांमध्ये मिराह एन्टरटेन्मेंट आणि राजवाडे यांनी नवा चित्रपट दाखल केला आहे.

दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी या चित्रपटाचे वर्णन अत्यंत समर्पक शब्दांत केले आहे. ’एक अतुलनीय, प्रेरणादायी, सर्जनशील
आणि अत्यंत मनोरंजक अशी ही निर्मिती आहे. `पोपट’ काही तरी अविश्वसनीय असे प्रेक्षकांसमोर ठेवतो आणि त्याचे वर्णन
करायला शब्द नाहीत. मी केवळ शहरी विषयांना हात घालणारा शहरी कथाकार आहे, अशी छाप आतापर्यंत माझ्यावर होती.
`पोपट’ हा ग्रामीण पार्श्वभूमीवर आकाराला येणारा आणि गावंढळ बोलीभाषा असलेला माझा पहिला चित्रपट आहे. `पोपट’ हा
विस्तारीत प्रेक्षकवर्गाला डोळ्यांसमोर ठेवून आकाराला आला आहे. शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही प्रकारच्या प्रेक्षकांना तो
आवडेल,“ असे ते म्हणतात. ’पोपट हा संपूर्णत: सर्जनशील निर्णय आहे आणि या विषयाला अनुसरून आवश्यक ती निरागसता
आणि भेद्यता या चित्रपटात अधोरेखित केली गेली आहे. या चित्रपटातील गावंढळ वळणाची जी
भाषा वापरली गेली आहे त्यात बराच गोडवा आहे आणि ती उभी करताना मला खूप मजा आली. ती प्रत्येकाशी अगदी सहजपणे
जोडली जाते आणि मनोरंजनाची एक वेगळी शक्ती त्यात आहे. `पोपट’ या चित्रपटात जी कथा सांगितली गेली आहे, तिला उत्तम
अशी पार्श्वभूमी आहे. एक कथाकार म्हणून मला एक वेगळा  कॅनव्हास साकारणे गरजेचे वाटते आणि ही बाब मी नेहमीच पाळत
आलो आहे. मिराह एन्टरटेन्मेंटने मला हे स्वातंत्र्य दिले त्याबद्दल कंपनीचा मी आभारी आहे, कारण शेवटी मनोरंजन करणे ही फार
मोठी जबाबदारी असते,“ असेही राजवाडे यांनी पुढे म्हटले.