Timepass (TP) trailer crosses 1 lakh YouTube Views in 3 Days

दुनियादारीच्या अभूतपूर्व यशानंतर झी टॉकीज ची प्रस्तुती असलेल्या” टाईम पास” म्हणजेच ‘ टीपी ‘ या चित्रपटाचा नेटीझन्स मध्ये बोलबाला सुरु असून अवघ्या पहिल्या तीनच दिवसांतच या चित्रपटाच्या ट्रेलरला एक लाखाच्यावर हिट्स मिळाल्या आहेत.

दुनियादारीच्या अभूतपूर्व यशानंतर झी टॉकीज ची प्रस्तुती असलेल्या” टाईम पास” म्हणजेच ‘ टीपी ‘ या चित्रपटाचा नेटीझन्स मध्ये बोलबाला सुरु असून अवघ्या पहिल्या तीनच दिवसांतच या चित्रपटाच्या ट्रेलरला एक लाखाच्यावर हिट्स मिळाल्या आहेत. बालक पालक (बीपी) या चित्रपटामधून मुलांच्या भावविश्वाचा एक वेगळा पैलू मांडणारे दिग्दर्शक रवि जाधव यांचा टीपी हा नवा चित्रपट येत्या ३ जानेवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

आयुष्यातल्या पहिल्या प्रेमाची कथा या ‘ टीपी ‘ मधून बघायला मिळणार असून या चित्रपटात वैभव मांगले, भालचंद्र कदम , मेघना एरंडे , उदय सबनीस, सुप्रिया पाठक , भूषण प्रधान , उर्मिला कानिटकर यांच्या भूमिका असून नायक नायिकेच्या भूमिकेत बीपी फेम प्रथमेश परब आणि केतकी माटेगावकर ही जोडी दिसणार आहे.

रवि जाधव यांच्या ‘टीपी’या चित्रपटाचा टिझर काही दिवसांपूर्वी यु ट्यूब वर टाकण्यात आला होता तेव्हापासूनच या चित्रपटाबद्दलची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात होती. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर यु ट्यूब वर टाकण्यात आला आणि केवळ तीनच दिवसांत या ट्रेलरला एक लाखाच्यावर हिट्स मिळाल्या असून हा ट्रेलर अनेकांनी फेसबुकवरही शेअर केला आहे. एवढ्या कमी कालावधीत एवढ्या जास्त हिट्स मिळवणारा हा पहिलाच चित्रपट ठरला असून मराठी सिनेसृष्टीत हा सर्वांच्या चर्चेचा विषय बनला आहे. कोवळ्या वयात मनात उमलणारी प्रेमाची भावना आणि ते प्रेम मिळवण्यासाठीची धडपड आणि दुसरीकडे पालकांचा होणारा विरोध या बाबी अतिशय रंजक पद्धतीने यात मांडण्यात आल्या आहेत. टाईमपास म्हणून सुरु झालेली दगडू आणि प्राजक्ताची हळुवार लव्ह स्टोरी पुढे काय स्वरूप घेते हे या चित्रपटातून प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.

झी टॉकीज, रवि जाधव आणि हिट चित्रपट हे समीकरण ‘नटरंग’ नंतर पुन्हा एकदा प्रेक्षकांना ‘ टीपी ‘  मधून अनुभवता येणार आहे. रवि जाधव यांची कथा-पटकथा-संवाद असलेल्या या म्युझिकल लव्हस्टोरीमध्ये प्रेमाचा मूड जपणारी गाणी असून ती चिनार-महेश यांनी संगीतबद्ध केली आहेत. याशिवाय या चित्रपटात  अनेक सरप्रायझेस बघायला मिळणार आहेत. एस्सेल व्हिजन प्रॉडकशन्सची निर्मिती असलेला ‘ टीपी ‘ ३ जानेवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.