Happy Journey With Priya Bapat and Atul Kulkarni

नुकत्याच येऊन गेलेल्या आणि प्रचंड यशस्वी ठरलेल्या `टाइम प्लीज’ या लोकप्रिय चित्रपटानंतर एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंटने हाती घेतलेल्या “हॅप्पी जर्नी” हया नवीन चित्रपटामध्ये दोन दिग्गज कलाकार एकत्र येत आहेत. राष्ट्रीय पुरस्कारविजेता चतुरस्त्र अभिनेता अतुल कुलकर्णा आणि आपल्या सशक्त अभिनयाने सिनेसृष्टीत आपले वेगळे स्थान निर्माण केलेली अभिनेत्री प्रिय बापट- कामत ही जोडी या सिनेमात पाहायला मिळणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या सिनेमासाठी आणखीन एका चेहर्‍याचा शोध सुरु असल्याने ती अभिनेत्री कोण असेल याबाबत सध्या सिनेसृष्टीत जोरदार चर्चा सुरु आहे.

अतुल कुलकर्णा हा मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील एक आघाडीचा कलाकार आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेता अतुल आपल्या भूमिकांच्या बाबतीत नेहमीच सतर्क असतो आणि मोजके दमदार चित्रपट करण्याकडे त्याचा कल असतो. 2013 या वर्षात प्रदर्शित झालेले `प्रेमाची गोष्ट’ आणि `पोपट’ हे त्याचे दोन चित्रपट अत्यंत यशस्वी ठरले. प्रिया बापट पुरस्कारविजेत्या “काक्स्पर्श” घराघरात पोहोचली आहे.

या चित्रपटात तीन मध्यवर्ता भूमिका असून दुसर्‍या  नायिकेचा शोध सुरू आहे.  हा चित्रपट पुणे येथे विविध ठिकाणी आणि गोव्याच्या निसर्गरम्य परिसरात दोन सत्रांमध्ये चित्रीत होणार आहे. एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंटचे संजय छाब्रिया म्हणाले, हा एक युवा, समकालीन आणि आधुनिक असा चित्रपट असून तो युवा पिढील साद घालेल. तो संपूर्ण नव्या धाटणीचा चित्रपट असून प्रेक्षक आमच्या या वेगळ्या प्रयत्नाला प्रतिसाद देतील, याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला डिसेंबर 2013 मध्ये सुरूवात होणार असून 2014 च्या मध्यावर तो प्रदर्शित होणे अपेक्षित आहे.