लॉकडाऊन मध्ये आवर्जून पहा या मराठी वेबसिरीज..

Top 5 Marathi Web Series of 2020 Watch Online Samantar Web Series, Kaale Dhande Web Series, Aani Kay Haav Series, Pandu Series, Ek Thi Begum Series

गेल्या काही दिवसांपासून आपण सतत नेटफ्लिक्स, Zee5, Amozon Prime किंवा MX Player यांच्या विषयी ऐकलं असेल किंवा तुमच्या मोबाईल मध्ये या पैकी App ही असतील.. सिम्पल फंडा है बॉस, जो भी हम थेटर मे जाके देखते है, वैसाही कंटेंट हमको इधर भी मिलता है । फक्त थोडे पैसे खर्च करायचे आणि Membarship घ्यायची.. झालं, मनोरंजनाच दुकान तुमच्या घरी नाही, तर मोबाईल मध्ये सुरू.. ते ही दर्जेदार Web Series.. जे तुम्हाला थिएटर मध्ये अनुभवायला मिळतं किंवा त्याहून जास्त मसाला, ड्रामा, ऍक्शन, रोमान्स आणि महत्वाचं म्हणजे फुल ऑन मनोरंजन..
अर्थात या सगळ्यात मराठी माणूस कसा मागे राहील.. या सगळ्यांच वारं मराठी चित्रपट सृष्टीतही शिरलं आणि दर्जेदार मराठी वेब सिरिज प्रेक्षकांच्या भेटीला आल्या..जाणून घेऊया काही मोजक्या पण तुम्ही नक्की बघायला पाहिजे अशा मराठी वेब सिरीज-

१. समांतर

Samantar MX Player Marathi Web Series Season 1 Episodes Watch Online Swwapnil Joshi Tejashwini Pandit
सुहास शिरवळकर यांच्या कादंबरी वर आधारित समांतर ही वेब सिरीज प्रेक्षकांच्या चांगलीच पसंत पडली आहे.. स्वप्नील जोशी आणि तेजस्वीनी पंडित यांची मुख्य भूमिका असलेली ही सिरीज म्हणजे घडून गेलेल्या भविष्यकाळाचा मागोवा आहे.. तांत्रिक बाजू ही उत्तम असल्याने ही वेब सिरीज पाहायला काहीच हरकत नाही

२. एक थी बेगम-

Ek Thi Begum 2020 MX Player Web Series Episdoes Season Watch Online Anuja Sathe
८० च्या दशकातील मुंबईतील गॅंगवॉर आणि ड्रग्स माफिया यांच्या भोवती सत्य घटनेवर आधारित वेब सिरीज म्हणजे एक थी बेगम..
क्राईम सस्पेन्स थ्रिलर या सदरात मोडणारी ही सिरीज मुळे मुंबई ते दुबई पर्यंत सगळ्यांचे धाबे दणाणून सोडणाऱ्या एका स्त्री ची गोष्ट आहे, जिचा नवऱ्याला नाहक मारलं जातं आणि ती सगळ्यांचा सूड घेते..

३.काळे धंदे-

Kaale Dhande Zee 5 Marathi Web Series All Episodes Season Watch Online Mahesh Manjrekar
हसून हसून पोट दुखायला लावणारी कॉमेडी म्हणजे Zee5 वरील काळे धंदे..ही विकी या तरूण छायाचित्रकारची गोष्ट आहे.. वेगवेगळ्या अप्रत्याशित परिस्थितीमुळे त्याचे जीवन कसे बदलते याबद्दल ही कहाणी फिरत आहे. गोष्टी व्यवस्थित लावण्याच्या बेताने तो आणखी गडबडीत अडकतो. निव्वळ करमणूक म्हणून
महेश मांजरेकर, संस्कृति बालगुडे आणि शुभंकर तावडे मुख्य भूमिका असलेला ही वेब सिरीज बघायला हरकत नाही..

४. पांडू

Pandu 2020 Mx Player Marathi Web Series All Episodes Season Watch Onlineकदाचित ही सिराज पाहून तरी मुंबई पोलिसांच्या परिस्थिती आपल्याला कल्पना येईल.. निदान ह्या लॉकडाऊन मध्ये तरी.. मुंबई शहरातील एका पोलिसांच्या रोजच्या जीवनात आपल्याला घेऊन जाईल. हा नर्म विनोद आहे..पोलीस हा पण एक माणूसच असतो, पोलिसांच्या मानवी बाजूचा शोध म्हणजे पांडू.. पांडु भ्रष्ट नाही, किंवा तो एक माचो नायकही नाही, त्याला शक्य तितक्या चांगल्या मार्गाने आपल्या मुलाचे संगोपन करायचे आहे.

५. ..आणि काय हवं

Aani Kay Hava MX Player Marathi Web Serier

प्रिया बापट आणि उमेश कामत या जोडगोळीची ‘..आणि काय हवं’ म्हणजे एक गोड गुलाबी कथा आहे जी तुम्हाला प्रेमात पाडते, पुन्हा पुन्हा प्रेम करायला लावते आणि ओठांवर हसू खुलवते.. पुण्यात राहणाऱ्या विवाहित मध्यमवर्गीय जोडप्याच्या जीवनातील प्रेमकथेचे गोड गुलाबी क्षण या सिरीज मधून आपल्याला पहायला मिळतात. नवरा बायको म्हणून असणारी भावनिक गुंतागुंत,एकमेकांना समजून घेणं हे या सगळ्या वर भाष्य करणारी ही सिरीज एकदा नक्की बघायला हवी..

तर या आहेत मराठीतील काही निवडक वेब सिरीज ज्यांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलंय.. तुम्ही पण पहिल्या असालचं आणि नसेल पाहिलं तर एकदा नक्कीच बघा.. कदाचित तुम्ही पण वेब सिरीज चे फॅन होऊन जाल..

Tags

marathi web series 2020,