Grand Music Launch Of Marathi Movie Mangalashtak Once More

वास्तव आयुष्यात सध्या लग्नसराई नसली तरी रुपेरी पडद्यावर मात्र सध्या ‘मौसम’ लग्नाचा आहे. प्रेक्षकही या लग्नसराईत वराती म्हणून मोठ्या उत्साहाने सामील होत आहेत. मात्र, ‘मॅरेज ऑफ द सिझन’ म्हणावं अशी लग्नसराई लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या लग्नसराईनिमित्त आयोजित धमाकेदार संगीत सोहळा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या थाटात पार पडला.

निर्माती रेणू देसाई यांच्या ‘मंगलाष्टक वन्स मोअर’ या चित्रपटातून स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे ही सर्वाधिक लोकप्रिय जोडी बोहल्यावर चढायला तयार झाली आहे. त्यांच्यासोबत मनोरंजनाची धमाल करण्यासाठी सई ताम्हणकर, कादंबरी कदम आणि हेमंत ढोमे हे कलाकारही सज्ज झाले आहेत. या ‘लग्नसराई’ चा संगीत सोहळा मोठ्या थाटात पार पडला. अवधूत गुप्ते, बेला शेंडे, वैशाली सामंत, स्वप्नील बांदोडकर, अभिजित सावंत, मंगेश बोरगावकर, कीर्ती किल्लेदार अशा अनेक जान्यामान्या

Mukta barve & Swapnil Joshi
Mukta barve & Swapnil Joshi

गायकांनी आजचा प्रतिभावान, लोकप्रिय गीतकार गुरु ठाकूर यांच्या शब्दांचा आधार घेत स्वप्नील जोशी आणि मुक्ता  बर्वे या विवाहोत्सुक युगुलाला सांगीतिक शुभेच्छा दिल्या.

तत्पूर्वी स्वप्नीलने आपल्या भावी वधूसाठी वामन हरी पेठेंच्या गोरेगाव येथील शोरूममध्ये दागिन्यांची खरेदी केली. त्यामध्ये मंगळसूत्र अर्थातच महत्वाचे होते. दोघांच्याही चेहऱ्यावर आगामी लग्नाची उत्सुकता आणि एक अनामिक हुरहूर स्पष्ट दिसत असली तरी एकमेकांवरचे प्रेम ही अजिबात लपत नव्हते. या दागिनेखरेदीनंतर ही वऱ्हाडी मंडळी संगीत सोहळ्याला आली आणि सोहळ्याला खरा रंग चढला. या वेळी व्हिडीओ पॅलेसचे नानूभाई जयसिंघानी उपस्थित होते.

प्रत्येकाच्या आयुष्यातील प्रेम भावनांना मोरपिसाच्या स्पर्शाचा मखमली अनुभव देणारा आणि नात्यातील वीण घट्ट करणारा, रेणू देसाई निर्मात, समीर हेमंत जोशी दिग्दर्शित ‘मंगलाष्टक वन्स मोअर’ हा बहुचर्चित चित्रपट २२ नोव्हेंबर रोजी राज्यभरात प्रदर्शित होत आहे. यासंदर्भात रेणू देसाई म्हणाल्या, संगीतकार नीलेश मोहरीर आणि गुरु ठाकूर यांसारख्या दिग्गजांसोबत काम करायला मिळणं ही सन्मानाची बाब आहे. मंगलाष्टक वन्स मोअरच्या गाण्यांमध्ये आम्ही साधेपणावर भर दिला आहे. त्यामुळेच यातील चारही गाण्यांमध्ये मेलडी आहे. तरुणाईच्या भावभावनांना हि गाणी नक्कीच स्पर्श करतील. ही गाणी ‘व्हिडीओ पॅलेसङ्कवर उपलब्ध आहेत.
Music of Mangalashtak Once More, producer and creative director Renu Desai’s maiden Marathi venture, is generating a lot of curiosity. The teasers of music released online have received an overwhelming response and the audiences are waiting for the music to hit the market.

The audio release of Mangalashtak Once More, produced by Shree Aadya Films, will take place on October 8 at The Westin Hotel, Goregaon (E), Mumbai. Usually the director of the film sits down with the music directors and discusses the music.