‘Mangalashtak Once More’ most awaited movie shooting ‘Once More’

Mukta Barve and Swapnil Joshi in Upcoming Movie

‘मंगलाष्टका वन्स मोअर’ या बहुचर्चित चित्रपटाचे शूटिंग वन्स मोअर

स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे यांच्या प्रमुख भूमिका

तेलगू चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री रेणू देसाई यांची निर्मिती

लग्न आणि प्रेम हे तरुणाईचे लाडके विषय.  प्रेमाच्या आणाभाका घेऊन लग्न करणे हे तर प्रत्येक तरुण-तरुणीचे स्वप्न असते. पण लग्न केल्यानंतर मात्र नात्यांमध्ये प्रेमाचा ओलावा राहतोच असे नाही. अशा वेळेस पती-पत्नीच्या नात्यांमधील रेशीमगाठी पुन्हा जुळवणे आवश्यक असते. याच संकल्पनेवर भाष्य करण्यासाठी तेलगू चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री रेणू देसाई यांच्या ‘श्री आध्या फिल्म्स’तर्फे मंगलाष्टका वन्स मोअर या चित्रपटाची निर्मिती केली जात आहे.

या चित्रपटातून पती-पत्नीमधील हळुवार नाते पडद्यावर मांडण्यासाठी सध्याची हिट जोडी स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे हे कसलेले
अभिनेते सज्ज झाले आहेत. त्ङ्माच्ङ्मासोबत ‘मंगलाष्टका वन्स मोअर’ मध्ये सई ताम्हणकर, हेमंत ढोमे आणि कादंबरी कदम हे सहकलाकारही धमाल उडवून देणार आहेत. लवकरच या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या दुसर्‍या शेड्युल्डची सुरुवात सप्टेंबर
२०१३ ह्या महिन्यात होणार आहे.

‘श्री आध्या फिल्म्स’ च्या बॅनरखाली अभिनेत्री रेणू देसाई यांची निर्मिती आणि समीर हेमंत जोशी यांचे लेखन-दिग्दर्शन असलेल्या ‘मंगलाष्टका वन्स मोअर’ या चित्रपटामधून तरुण जोडप्याचे आयुष्य चित्रित केले जाणार आहे. या चित्रपटाचे पहिले चित्रीकरण जुलै २०१३ ह्या महिन्यात संपन्न झाले. आता येत्या सप्टेंबर महिन्यात चित्रपटाच्या चित्रीकरणाचा दुसरा कालावधी सुरू होणार असून त्यासाठी प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर आणि दुनियादारी या यशस्वी चित्रपटाचे दिग्दर्शक संजय जाधव हे  ‘मंगलाष्टका वन्स मोअर’चे छायांकन करणार आहेत. तसेच लोकप्रियसंगीतकार निलेश मोहरीर हे या चित्रपटाला संगीत देत असून नुकतेच चित्रपटातील गाण्यांचे रेकॉर्डिंग पूर्ण झाले आहे. उत्कृष्ट पटकथा, उच्च निर्मीतिमूल्य आणि तरुणाईच्ङ्मा जगण्यावर भाष्य करणारा हा चित्रपट लवकरच रसिकांच्या भेटीस येणार असल्याचे रेणू देसाई यांनी सांगितले.