Chinmay Mandlekar to play character of Vasantrao Naik : Mahanayak Movie

Chinmay Mandlekar to play character of Vasantrao Naik Mahanayak Movie

Chinmay Mandlekar playing character of Maharashtra’s ex-chief minister Vasantrao Naik in a Movie ‘Mahanayak Vasant Tu..’

महाराष्ट्राला लाभलेलं एक खंबीर नेतृत्व म्हणजे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक. ख-या अर्थाने जनतेच्या भावनांचा विचार करन आपली रणनीती आखणारे व त्यानुसार प्रश्न समजून घेऊन सोडविणारे वसंतराव नाईक हे कुशल नेते होते. 2013 हे वसंतराव नाईक यांचे जन्मशताब्दी वर्ष यानिमित्ताने त्यांच्या आखीव-रेखीव आणि तळपत्या कारकिर्दाचा प्रवास मांडणारा ‘महानायक वसंत तू…’ हा मराठी चित्रपट रपेरी पडदयावर आकारास येतोय. विदर्भातल्या मंडळीनी या चित्रपटाची मुहूर्तमेढ रोवली असून चित्रपटाचे लेखन – दिग्दर्शन निलेश रावसाहेब जळमकर करीत आहेत.

Chinmay Mandlekar as Vasantrao Naik Mahanayak Movie
Chinmay Mandlekar as Vasantrao Naik Mahanayak Movie

बळीराम राठोड निर्मित, तुकाराम बिडकर प्रस्तुत ‘महानायक’ चित्रपटात वसंतराव नाईक यांची भूमिका अभिनेता चिन्मय मांडलेकर साकारीत आहे. एखादया चित्रपटाला आवश्यक असणारे अनेक प्रसंग वसंतराव नाईक यांच्या आयुष्यात ठासून भरले आहेत. एका तांडयाचा नायक ते महाराष्ट्राचा महानायक असा त्यांचा प्रवास या चित्रपटातून मांडण्यात येणार आहे.

‘महानायक’ चित्रपटात वसंतराव नाईक यांच्या तरणपणीच्या प्रवासासोबत प्रौढ काळातील वयाचे टप्पे रेखाटण्यात येणार आहेत. चित्रपटातील कथानकाचा काळ आणि त्याला साजेसा त्यांचा गेटअप यावर चित्रपटाच्या टीमने विशेष मेहनत घेतली आहे. रंगभूषाकार प्रदीप पेमगिरीकर यांनी वसंतराव नाईक यांच्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास करन चिन्मय यांचा मेकअप केला असून प्रोथेस्टिक पध्दतीच्या लेअर मेकअप करण्यात आला आहे. रश्मी रोडे यांनी चित्रपटासाठी कॉस्च्युम डिझाईनिंग केले आहे. ‘महानायक’ चित्रपटाच्या कार्यकारी निर्मात्याची भूमिका विश्वजीत देशपांडे सांभाळीत असून निर्मिती व्यवस्थापक योगेश जाधव आहेत. चित्रपटातील काळाला साजेसे कला दिग्दर्शन गिरीश कोळपकर करीत असून संगीत आणि पार्श्वसंगीत मंदार खरे यांचे आहे.

या चित्रपटाच्या निमित्ताने चिन्मय मांडलेकर यांनी मनोगत व्यक्त केली की, ‘महानायक’ चित्रपटात नायक साकारायला मिळतोय, हीच खूप मोठी गोष्ट आहे. ज्या माणसाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद सलग 11 वर्षे भूषविले त्यांच्याबद्दल पुढच्या पिढीला माहिती असणे गरजेचे आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने मला वसंतराव नाईक यांचे व्यक्तिमत्व साकारायला मिळत आहे हे माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. अभिनेता भूमिका निवडत नाहीत तर भूमिकाच अभिनेत्याला निवडतात, अशी माझी धारणा असल्याने या कसोटीला उतरण्याचा मी शंभर टक्के प्रयत्न करीत आहे’.

उदया 18 ऑगस्ट वसंतराव नाईक यांचा पुण्यतिथी दिन त्यांना अभिवादन करून 19 ऑगस्टपासून ‘महानायक’ चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरवात करण्यात येत आहे.

Chinmay Mandlekar in Mahanayak Marathi Movie
Chinmay Mandlekar in Mahanayak Marathi Movie
Chinmay Mandlekar in Biopic on Maharashtra's ex-chief minister Vasantrao Naik
Chinmay Mandlekar in Biopic on Maharashtra’s ex-chief minister Vasantrao Naik

Tags

ex mahanayk,