Marathi Movie News, Celebrity News, Cinema News, Chitrapat News, Gossips, Latest happenings https://marathistars.com/category/news/ Marathi Actress Wallpapers,Photos,Images,tv Serial Actress,Photos, Fri, 21 Aug 2020 10:29:27 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.2.2 40256045 तान्हाजी फेम शरद केळकर निर्मित, संदीप पाठक अभिनित ‘ईडक’ झी५ वर प्रदर्शित https://marathistars.com/news/sandeep-pathaks-idak-marathi-movie-zee5/ https://marathistars.com/news/sandeep-pathaks-idak-marathi-movie-zee5/#respond Fri, 21 Aug 2020 10:28:29 +0000 https://marathistars.com/?p=35399 मराठी सिनेसृष्टीत अभिनेत्यांची ओळख ही केवळ त्यांच्या लूक्स पुरती मर्यादित न राहता त्यांच्या अभिनय कौशल्याद्वारे ते अधिक स्मरणात राहतात. मराठी सिनेसृष्टीतील असाच एक अभिनेता म्हणजे संदीप पाठक. संदीप हा मूळचा बीड जिल्ह्यातील माजलगावचा रहिवासी. मात्र अभिनयाच्या आवडीपोटी त्याने पुण्यातील ललित कला केंद्रातून नाट्य शास्त्राची पदवी संपादन केली. त्यानंतर खऱ्या अर्थाने सुरू झाला संदीपचा अभिनय क्षेत्रातील […]

The post तान्हाजी फेम शरद केळकर निर्मित, संदीप पाठक अभिनित ‘ईडक’ झी५ वर प्रदर्शित appeared first on MarathiStars.

]]>
AmpedSense.OptimizeAdSpot('AP'); AmpedSense.OptimizeAdSpot('IL'); AmpedSense.OptimizeAdSpot('IR');

मराठी सिनेसृष्टीत अभिनेत्यांची ओळख ही केवळ त्यांच्या लूक्स पुरती मर्यादित न राहता त्यांच्या अभिनय कौशल्याद्वारे ते अधिक स्मरणात राहतात. मराठी सिनेसृष्टीतील असाच एक अभिनेता म्हणजे संदीप पाठक. संदीप हा मूळचा बीड जिल्ह्यातील माजलगावचा रहिवासी. मात्र अभिनयाच्या आवडीपोटी त्याने पुण्यातील ललित कला केंद्रातून नाट्य शास्त्राची पदवी संपादन केली. त्यानंतर खऱ्या अर्थाने सुरू झाला संदीपचा अभिनय क्षेत्रातील प्रवास. अनेक प्रायोगिक नाटकांमध्ये काम केल्यानंतर संदीपला व्यावसायिक रंगभूमीवर पहिली  संधी मिळाली ती म्हणजे पुरुषोत्तम बेर्डे दिग्दर्शित ‘सर आली धावून’ या नाटकात. या नाटकात त्याने दस्तुरखुद्द लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत काम केले. या नाटकात संदीपने साकारलेल्या मुरलीधर कोयंडे ह्या भूकंप पीडिताच्या भूमिकेला प्रेक्षकांंसोबतच लक्ष्मीकांत बेर्डेे यांंची देखील कौतुकाची थाप मिळाली.

२००१ साली संदीपने मुंबईत पाऊल ठेवले आणि विविध मराठी चित्रपट, मालिका आणि नाटकाद्वारे तो प्रेक्षकांच्या भेटीला आला. श्वास, हरिश्चंद्राची फॅक्टरी, नटसम्राट, एक हजाराची नोट यांसारखे दर्जेदार चित्रपट, जादू तेरी नजर, व्यक्ती आणि वल्ली, सखाराम बाईंडर, वऱ्हाड निघालंय लंडनला यांसारखी प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करणारी नाटकं, हसा चकटफू, असंभव, रुद्रम यांसारख्या लोकप्रिय मालिका ह्या कलाकृतींनी संदीपची कारकीर्द समृध्द केली. केवळ विनोदीच नव्हे तर गंभीर धाटणीच्या भूमिकाही त्याने चपखलपणे रंगवल्या आहेत.

ह्या प्रवासात त्याला कधी प्रसिद्धी मिळाली तर कधी निराशेला सामोरं जावं लागलं. परंतु मिळालेल्या प्रसिद्धीची हवा त्याने कधी डोक्यात जाऊन दिली नाही की कधी निराशेच्या गर्तेत अडकून त्याने माघार घेतली नाही. वाट्याला आलेल्या छोट्या छोट्या भुमिकाही त्याने आनंदाने स्विकारल्या. आता तब्बल २० वर्षांनतर संदीप पहिल्यांदा ‘ईडक’ ह्या चित्रपटाद्वारे नायक म्हणून आपल्यासमोर येणार आहे . शरद केळकर निर्मित आणि दीपक गावडे दिग्दर्शित हा चित्रपट झी फाईव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर आज प्रदर्शित होत आहे.

संदीपची ही वीस वर्षांची कारकीर्द नक्कीच नवीन कलावंतांसाठी प्रेरणादायी ठरेल.त्याची ही अभिनय क्षेत्रातील वाटचाल उत्तरोत्तर अशीच बहरत जाओ याच सदिच्छा.

The post तान्हाजी फेम शरद केळकर निर्मित, संदीप पाठक अभिनित ‘ईडक’ झी५ वर प्रदर्शित appeared first on MarathiStars.

]]>
https://marathistars.com/news/sandeep-pathaks-idak-marathi-movie-zee5/feed/ 0 35399
सोनी मराठीच्या ‘आई माझी काळुबाई’ मालिकेत ‘प्राजक्ता गायकवाड’ साकारणार आर्याचं पात्र https://marathistars.com/news/aai-mazi-kalubai-sony-marathi-prajakta-gaikwad-in-lead-role/ https://marathistars.com/news/aai-mazi-kalubai-sony-marathi-prajakta-gaikwad-in-lead-role/#respond Mon, 27 Jul 2020 17:45:06 +0000 https://marathistars.com/?p=35379 आई माझी काळुबाई’ ही मालिका लवकरच सोनी मराठी वाहिनीवर सुरू होत आहे. नुकताच त्याचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला. प्रोमो मधून ही गोष्ट आर्या नावाच्या मुलीची, तिच्या भक्तीची आणि काळूबाईच्या शक्तीची आहे हे कळतंय. आर्या म्हणजेच ‘प्राजक्ता गायकवाड’ आपल्याला सोनी मराठी वाहिनीवर पाहायला मिळणार आहे. या आधी प्राजक्ता गायकवाड हिला आपण ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ मालिकेत ऐतिहासिक […]

The post सोनी मराठीच्या ‘आई माझी काळुबाई’ मालिकेत ‘प्राजक्ता गायकवाड’ साकारणार आर्याचं पात्र appeared first on MarathiStars.

]]>
AmpedSense.OptimizeAdSpot('AP'); AmpedSense.OptimizeAdSpot('IL'); AmpedSense.OptimizeAdSpot('IR');

आई माझी काळुबाई’ ही मालिका लवकरच सोनी मराठी वाहिनीवर सुरू होत आहे. नुकताच त्याचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला. प्रोमो मधून ही गोष्ट आर्या नावाच्या मुलीची, तिच्या भक्तीची आणि काळूबाईच्या शक्तीची आहे हे कळतंय. आर्या म्हणजेच ‘प्राजक्ता गायकवाड’ आपल्याला सोनी मराठी वाहिनीवर पाहायला मिळणार आहे. या आधी प्राजक्ता गायकवाड हिला आपण ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ मालिकेत ऐतिहासिक भूमिकेत पाहिलं आहे, पण आता ती एका कॉलेज मधल्या तरुणीची भूमिका पहिल्यांदाच साकारत आहे. या भूमिकेसाठी तिने थोडे वजन कमी केलं आहे इतकंच नाही तर स्वतःची स्टाईल आणि लूक सुद्धा प्राजक्ताने या भूमिकेसाठी बदलेल आहे.

‘आई माझी काळुबाई’ या मालिकेच्या प्रोमोने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे. प्राजक्ताला एका नवीन भूमिकेत पाहण्यासाठी तिचा चाहतावर्ग देखील उत्सुक आहे. प्राजक्ता पहिल्यांदाच आपल्या वयाची भूमिका साकारत आहे. आर्याचं एक पाऊल कशाप्रकारे तिचं आयुष्य बदलेल, तिच्या मदतीला काळुबाई कशी येईल हे सर्व पाहणं खूप मनोरंजक असणार आहे. प्राजक्ता सोबत या मालिकेत आपल्याला अलका कुबल आठल्ये देखील पाहायला मिळणार आहेत. ‘गोष्ट आर्याच्या भक्तीची, काळुबाईच्या शक्तीची’ पाहा ‘आई माझी काळुबाई’ लवकरच सोनी मराठी वाहिनीवर…

The post सोनी मराठीच्या ‘आई माझी काळुबाई’ मालिकेत ‘प्राजक्ता गायकवाड’ साकारणार आर्याचं पात्र appeared first on MarathiStars.

]]>
https://marathistars.com/news/aai-mazi-kalubai-sony-marathi-prajakta-gaikwad-in-lead-role/feed/ 0 35379
First look of LAW OF LOVE Launched Digitally https://marathistars.com/news/first-look-of-law-of-love-launched-digitally/ https://marathistars.com/news/first-look-of-law-of-love-launched-digitally/#respond Sun, 24 May 2020 15:44:29 +0000 https://marathistars.com/?p=35363 The ever-changing figures of CORONA, the rising graphs, incidents that straightway catch hold of your heart and comforting news for a while of CORONA under control…Human minds today have to struggle with high and low life. The stress levels are rising while we are actually sort of resting at home. Modern life has been made […]

The post First look of LAW OF LOVE Launched Digitally appeared first on MarathiStars.

]]>
AmpedSense.OptimizeAdSpot('AP'); AmpedSense.OptimizeAdSpot('IL'); AmpedSense.OptimizeAdSpot('IR');

The ever-changing figures of CORONA, the rising graphs, incidents that straightway catch hold of your heart and comforting news for a while of CORONA under control…Human minds today have to struggle with high and low life. The stress levels are rising while we are actually sort of resting at home. Modern life has been made to surrender to digital awareness created and maintained by Online Yoga lessons, motivational lectures and others to keep stresses under control.

Entertainment has been a part of motivation and will be an important aspect of our lives in the future. The entertainment brought to us through the medium on films has always been found useful as a stress buster.

The impact of Lockdown has been equally felt and faced by the film industry on the whole. The schedules for various films and TV serials had to be abandoned suddenly. With the closure of cinema theaters, the release and promotion of new films have been adversely affected. It is within this scenario around and with a positive perspective, Producer and Screen Play writer J. Uday has used this period of a lull to bring a new Marathi film “Law of Love” for connoisseur Marathi audiences. As most of the people have adjusted to the new Digital regime and have been active in this medium, the producer has unveiled First Look Poster of the film “Law of Love” through social media. The audiences have provided a huge positive response to the same.

Just as the name of the film is out of the box, there is no doubt that the story would also follow suit. This is the debut film for Mr. J. Uday, Producer, and Screen Play writer. This film is going to be a truly viable option for the changed lifestyle of audiences after lockdown. The details about the cast of the film and the fresh ingredients to be brought to you are yet to be announced and hence the anxiety about this film will continue to soar till the film hits the screens.

The post First look of LAW OF LOVE Launched Digitally appeared first on MarathiStars.

]]>
https://marathistars.com/news/first-look-of-law-of-love-launched-digitally/feed/ 0 35363
अभिनेता साईप्रसाद गुंडेवार यांच्यावरील अंत्यसंस्कारांचे थेट प्रेक्षपण! https://marathistars.com/news/actor-sai-gundewar-passed-away/ https://marathistars.com/news/actor-sai-gundewar-passed-away/#respond Fri, 15 May 2020 10:52:25 +0000 https://marathistars.com/?p=35341 शनिवार दिनांक १६ मे रोजी लॉस अँजेलिस सकाळी ८:०० ते ११:४५ वा. आणि भारतातून रात्रौ ९: ०० वाजता थेट प्रेक्षपण. लॉस अँजेलिस -(१५ -०५-२०); हॉलिवूड, बॉलिवूड तसेच मराठी कलाक्षेत्रातील हरहुन्नरी अष्टपैलू युवा अभिनेता साईप्रसाद गुंडेवार याचे गेल्या शनिवारी दिनांक ९ मे २०२० रोजी सायंकाळी ७:०० वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार दिनांक १० मे २०२० रोजी सकाळी ७:३० […]

The post अभिनेता साईप्रसाद गुंडेवार यांच्यावरील अंत्यसंस्कारांचे थेट प्रेक्षपण! appeared first on MarathiStars.

]]>
AmpedSense.OptimizeAdSpot('AP'); AmpedSense.OptimizeAdSpot('IL'); AmpedSense.OptimizeAdSpot('IR');

शनिवार दिनांक १६ मे रोजी लॉस अँजेलिस सकाळी ८:०० ते ११:४५ वा. आणि भारतातून रात्रौ ९: ०० वाजता थेट प्रेक्षपण.

लॉस अँजेलिस -(१५ -०५-२०); हॉलिवूड, बॉलिवूड तसेच मराठी कलाक्षेत्रातील हरहुन्नरी अष्टपैलू युवा अभिनेता साईप्रसाद गुंडेवार याचे गेल्या शनिवारी दिनांक ९ मे २०२० रोजी सायंकाळी ७:०० वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार दिनांक १० मे २०२० रोजी सकाळी ७:३० वाजता) अमेरिकेतील लॉस अँजेलिस येथील इस्पितळात ‘ग्लायोब्लास्टोमा’ या ब्रेन कॅन्सरने निधन झाले होते. सध्या अमेरिकेतील कोरोना मृत्यू व लॉकडाऊनमुळे साईचे अंत्यसंस्कार लांबणीवर ठेवावे लागले. एका आठवड्यानंतर अमेरिका प्रशासनाने मान्यता दिल्यानंतर शनिवार दिनांक १६ मे २०२० रोजी लॉस अँजेलिस येथे सकाळी ८:०० ते ११:४५ वा. या दरम्यान होणार आहेत. भारतातून १६ मे २०२० रोजी रात्रौ ९: ०० वाजता थेट प्रेक्षपण पाहता येईल. हे अंत्यसंस्कार प्रत्यक्ष पाहण्यासाठी https://oneroomstreaming.com/ वेबसाईवर जाऊन [email protected] हा ईमेल आणि ZHPNDX या पासवर्डचा वापर करावा लागणार आहे.

Sai Gundewar

साई गुंडेवार यांनी एम टीव्हीच्या स्प्लिट्स व्हिला पर्व चार, स्टार प्लसवरील सर्व्हायवर तसेच अमेरिकेतील लोकप्रिय एस.डब्ल्यू.ए.टी. , कॅग्नी अँड लॅसी, द ऑरव्हिले, मार्स कॉस्पिरसी, द कार्ड मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. हिंदी चित्रपटांमध्ये त्याने ‘रॉक ऑन’, ‘पप्पू कान्ट डान्स साला’, ‘लव्ह ब्रेकअप जिंदगी’, ‘डेव्हिड’, ‘आय मी और मैं’, ‘पीके’, ‘बाजार’ इत्यादी हिंदी चित्रपटांसोबतच काही हॉलिवूडच्या चित्रपट व लघुपटांमध्ये आणि विविध जाहिरातपटांमध्ये त्याने भूमिका केल्या आहेत. तसेच डॉ. मीना नेरुरकर यांच्या ‘ए डॉट कॉम मॉम‘ या एकमेव मराठी चित्रपटात त्याची प्रमुख भूमिका केली आहे. त्याच्या पश्चात पत्नी फॅशन डिझायनर सपना अमीन, आई शुभांगी व राजश्री, वडील राजीव गुंडेवार असा परिवार आहे. या आवडत्या अभिनेत्याच्या तरुण वयात कर्क रोगामुळे झालेल्या दुर्दैवी मृत्यूमुळे चित्रपटसृष्टीसह सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

The post अभिनेता साईप्रसाद गुंडेवार यांच्यावरील अंत्यसंस्कारांचे थेट प्रेक्षपण! appeared first on MarathiStars.

]]>
https://marathistars.com/news/actor-sai-gundewar-passed-away/feed/ 0 35341
लॉकडाऊन मध्ये आवर्जून पहा या मराठी वेबसिरीज.. https://marathistars.com/news/top-5-marathi-webseries-2020/ https://marathistars.com/news/top-5-marathi-webseries-2020/#respond Wed, 29 Apr 2020 12:42:25 +0000 https://marathistars.com/?p=35280 गेल्या काही दिवसांपासून आपण सतत नेटफ्लिक्स, Zee5, Amozon Prime किंवा MX Player यांच्या विषयी ऐकलं असेल किंवा तुमच्या मोबाईल मध्ये या पैकी App ही असतील.. सिम्पल फंडा है बॉस, जो भी हम थेटर मे जाके देखते है, वैसाही कंटेंट हमको इधर भी मिलता है । फक्त थोडे पैसे खर्च करायचे आणि Membarship घ्यायची.. झालं, मनोरंजनाच […]

The post लॉकडाऊन मध्ये आवर्जून पहा या मराठी वेबसिरीज.. appeared first on MarathiStars.

]]>
AmpedSense.OptimizeAdSpot('AP'); AmpedSense.OptimizeAdSpot('IL'); AmpedSense.OptimizeAdSpot('IR');

गेल्या काही दिवसांपासून आपण सतत नेटफ्लिक्स, Zee5, Amozon Prime किंवा MX Player यांच्या विषयी ऐकलं असेल किंवा तुमच्या मोबाईल मध्ये या पैकी App ही असतील.. सिम्पल फंडा है बॉस, जो भी हम थेटर मे जाके देखते है, वैसाही कंटेंट हमको इधर भी मिलता है । फक्त थोडे पैसे खर्च करायचे आणि Membarship घ्यायची.. झालं, मनोरंजनाच दुकान तुमच्या घरी नाही, तर मोबाईल मध्ये सुरू.. ते ही दर्जेदार Web Series.. जे तुम्हाला थिएटर मध्ये अनुभवायला मिळतं किंवा त्याहून जास्त मसाला, ड्रामा, ऍक्शन, रोमान्स आणि महत्वाचं म्हणजे फुल ऑन मनोरंजन..
अर्थात या सगळ्यात मराठी माणूस कसा मागे राहील.. या सगळ्यांच वारं मराठी चित्रपट सृष्टीतही शिरलं आणि दर्जेदार मराठी वेब सिरिज प्रेक्षकांच्या भेटीला आल्या..जाणून घेऊया काही मोजक्या पण तुम्ही नक्की बघायला पाहिजे अशा मराठी वेब सिरीज-

१. समांतर

Samantar MX Player Marathi Web Series Season 1 Episodes Watch Online Swwapnil Joshi Tejashwini Pandit
सुहास शिरवळकर यांच्या कादंबरी वर आधारित समांतर ही वेब सिरीज प्रेक्षकांच्या चांगलीच पसंत पडली आहे.. स्वप्नील जोशी आणि तेजस्वीनी पंडित यांची मुख्य भूमिका असलेली ही सिरीज म्हणजे घडून गेलेल्या भविष्यकाळाचा मागोवा आहे.. तांत्रिक बाजू ही उत्तम असल्याने ही वेब सिरीज पाहायला काहीच हरकत नाही

२. एक थी बेगम-

Ek Thi Begum 2020 MX Player Web Series Episdoes Season Watch Online Anuja Sathe
८० च्या दशकातील मुंबईतील गॅंगवॉर आणि ड्रग्स माफिया यांच्या भोवती सत्य घटनेवर आधारित वेब सिरीज म्हणजे एक थी बेगम..
क्राईम सस्पेन्स थ्रिलर या सदरात मोडणारी ही सिरीज मुळे मुंबई ते दुबई पर्यंत सगळ्यांचे धाबे दणाणून सोडणाऱ्या एका स्त्री ची गोष्ट आहे, जिचा नवऱ्याला नाहक मारलं जातं आणि ती सगळ्यांचा सूड घेते..

३.काळे धंदे-

Kaale Dhande Zee 5 Marathi Web Series All Episodes Season Watch Online Mahesh Manjrekar
हसून हसून पोट दुखायला लावणारी कॉमेडी म्हणजे Zee5 वरील काळे धंदे..ही विकी या तरूण छायाचित्रकारची गोष्ट आहे.. वेगवेगळ्या अप्रत्याशित परिस्थितीमुळे त्याचे जीवन कसे बदलते याबद्दल ही कहाणी फिरत आहे. गोष्टी व्यवस्थित लावण्याच्या बेताने तो आणखी गडबडीत अडकतो. निव्वळ करमणूक म्हणून
महेश मांजरेकर, संस्कृति बालगुडे आणि शुभंकर तावडे मुख्य भूमिका असलेला ही वेब सिरीज बघायला हरकत नाही..

४. पांडू

Pandu 2020 Mx Player Marathi Web Series All Episodes Season Watch Onlineकदाचित ही सिराज पाहून तरी मुंबई पोलिसांच्या परिस्थिती आपल्याला कल्पना येईल.. निदान ह्या लॉकडाऊन मध्ये तरी.. मुंबई शहरातील एका पोलिसांच्या रोजच्या जीवनात आपल्याला घेऊन जाईल. हा नर्म विनोद आहे..पोलीस हा पण एक माणूसच असतो, पोलिसांच्या मानवी बाजूचा शोध म्हणजे पांडू.. पांडु भ्रष्ट नाही, किंवा तो एक माचो नायकही नाही, त्याला शक्य तितक्या चांगल्या मार्गाने आपल्या मुलाचे संगोपन करायचे आहे.

५. ..आणि काय हवं

Aani Kay Hava MX Player Marathi Web Serier

प्रिया बापट आणि उमेश कामत या जोडगोळीची ‘..आणि काय हवं’ म्हणजे एक गोड गुलाबी कथा आहे जी तुम्हाला प्रेमात पाडते, पुन्हा पुन्हा प्रेम करायला लावते आणि ओठांवर हसू खुलवते.. पुण्यात राहणाऱ्या विवाहित मध्यमवर्गीय जोडप्याच्या जीवनातील प्रेमकथेचे गोड गुलाबी क्षण या सिरीज मधून आपल्याला पहायला मिळतात. नवरा बायको म्हणून असणारी भावनिक गुंतागुंत,एकमेकांना समजून घेणं हे या सगळ्या वर भाष्य करणारी ही सिरीज एकदा नक्की बघायला हवी..

तर या आहेत मराठीतील काही निवडक वेब सिरीज ज्यांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलंय.. तुम्ही पण पहिल्या असालचं आणि नसेल पाहिलं तर एकदा नक्कीच बघा.. कदाचित तुम्ही पण वेब सिरीज चे फॅन होऊन जाल..

The post लॉकडाऊन मध्ये आवर्जून पहा या मराठी वेबसिरीज.. appeared first on MarathiStars.

]]>
https://marathistars.com/news/top-5-marathi-webseries-2020/feed/ 0 35280
‘समांतर’ या वेब सिरीजला अवघ्या ३ दिवसात मिळाली ८० लाखांहून अधिक प्रेक्षकांची पसंती.. https://marathistars.com/news/swapnil-joshi-samantar-web-series-mx-player/ https://marathistars.com/news/swapnil-joshi-samantar-web-series-mx-player/#respond Wed, 18 Mar 2020 07:51:59 +0000 https://marathistars.com/?p=35200 सगळ्यांचा लाडका अभिनेता स्वप्नील जोशी हा अनेक हिट सिनेमे आणि टीव्ही मालिकांमध्ये झळकला आहे. हा अभिनेता आता पहिल्यांदाच ‘समांतर’ नावाच्या मराठी वेब मालिकेतून भेटीला आला असून स्वप्नील जोशीने कुमार महाजन ही व्यक्तिरेखा साकारली आहे. त्याच्या बरोबर तेजस्विनी पंडीत ही अभिनेत्री सुद्धा या सिरीजमध्ये दिसली आहे. या मालिकेची निर्मिती अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक डी निशाणदार […]

The post ‘समांतर’ या वेब सिरीजला अवघ्या ३ दिवसात मिळाली ८० लाखांहून अधिक प्रेक्षकांची पसंती.. appeared first on MarathiStars.

]]>
AmpedSense.OptimizeAdSpot('AP'); AmpedSense.OptimizeAdSpot('IL'); AmpedSense.OptimizeAdSpot('IR');

सगळ्यांचा लाडका अभिनेता स्वप्नील जोशी हा अनेक हिट सिनेमे आणि टीव्ही मालिकांमध्ये झळकला आहे. हा अभिनेता आता पहिल्यांदाच ‘समांतर’ नावाच्या मराठी वेब मालिकेतून भेटीला आला असून स्वप्नील जोशीने कुमार महाजन ही व्यक्तिरेखा साकारली आहे. त्याच्या बरोबर तेजस्विनी पंडीत ही अभिनेत्री सुद्धा या सिरीजमध्ये दिसली आहे. या मालिकेची निर्मिती अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक डी निशाणदार यांच्या ‘जीसिम्स’ने केली असून पहिल्यांदाच वेब सिरीज सेगमेंटकरिता त्यांनी भागीदारी केली आहे. ही वेबसिरीज ओव्हर-द-टॉप (ओटीटी) वर प्रदर्शित झाली आणि ‘एमएक्स प्लेयर’च्या वेब सिरीज सेगमेंटमध्ये उपलब्ध आहे. ‘समांतर’ ही वेबमालिका सुहास शिरवळकर यांच्या ‘समांतर’ कादंबरीबर आधारित असून प्रसिद्ध दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी या वेब सिरीजचे दिग्दर्शन केले आहे.

‘समांतर’ या वेब मालिकेला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद पाहायला मिळत असून प्रेक्षकांना या वेबमालिकेतील स्वप्नील जोशी, तेजस्विनी पंडित आणि इतर कलाकारांची देखील कामे आवडत आहेत. कुमार महाजनचे भविष्य सुदर्शन चक्रपाणी या माणसाशी कसे जोडले गेले आहे आणि आपले भविष्य जाणून घेण्यासाठी कुमार महाजन चक्रपाणी पर्यंत कसा आणि कोणकोणत्या संकटाना समोर जात त्याचा शोध घेतो हा सगळा प्रवास पाहणे प्रेक्षकांसाठी अतिशय रंजक ठरत असून ही वेबमालिका “एमएक्स प्लेयर” या अग्रगण्य ओटीटी मंचावर उपलब्ध असून या मालिकेला फक्त ३ दिवसात ८० लाखाहून अधिक व्हूज मिळाले आहेत. ही मालिका दिवसेंदिवस अधिक लोकप्रिय होत असून आजपर्यंतच्या मराठी वेबच्या इतिहासातील ‘समांतर’ ही मालिका सर्वाधिक प्रेक्षकांनी पाहिलेली मालिका बनली आहे.Samantar Marathi Web Series Swapnil Joshi Gseams

स्वप्नील जोशी म्हणतो की, “समांतर’चे लेखन सुहास शिरवळकर यांनी केले असून ती माझी आवडती कादंबरी आहे. या आधी मी त्यांच्या पुस्तकावर आधारित असलेल्या अणि काही वर्षांपूर्वी आलेल्या ‘दुनियादारी’ या सिनेमात काम केले होते. मला मनापासून वाटते कि, त्यांच्या लेखणीत खूप ताकद आहे आणि त्यांच्या लिखाणावर खूप चांगले काम होऊन उत्तम दर्जाचा व्हिजुअल कॉन्टेन्ट तयार होऊ शकतो. मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की, मला ‘समांतर’ करायला मिळते आहे. ‘दुनियादारी’ केल्यानंतर पुन्हा एकदा त्यांच्या नावाशी जोडले जाणे ही माझ्यासाठी खूप आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. श्रीमती शिरवळकर आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचा मी ऋणी आहे कारण हे शिवधनुष्य पेलण्यासाठी त्यांनी माझ्यावर, सतीश राजवाडे आणि ‘जीसिम्स’ वर विश्वास दाखवला.”

स्वप्नील जोशी पुढे म्हणाला की, “सतीशवर सुद्धा या पुस्तकाचा फार मोठा प्रभाव आहे. या कथेसाठी तो एक योग्य असा दिग्दर्शक आहे. या मालिकेच्या माध्यमातून सतीश आणि मी एकत्र येत आहोत. त्याचबरोबर या मालिकेचे निर्माते ‘जीसिम्स’ने कथेचे दर्जेदार मालिकेत रूपांतर करण्याची महत्वपूर्ण कामगिरी केली आहे. संपूर्ण तंत्रज्ञ चमू आणि कलाकारांनी या मालिकेसाठी अणि ती दर्जेदार होण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. ‘समांतर’मध्ये माझी कुमार नावाची भूमिका आहे आणि ही व्यक्तिरेखा मी याआधी केलेल्या व्यक्तिरेखांपेक्षा खूप वेगळी आहे. एक अभिनेता म्हणून ही व्यक्तिरेखा साकारणे माझ्यासाठी खूप आव्हानात्मक होते. त्याचबरोबर ही मालिका ‘एमएक्स प्लेयर’सारख्या कंपनीच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली असल्याने ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचेल याची मला पूर्ण खात्री आहे.”

“शुभारंभ झाल्यापासून या मालिकेला फार मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला आहे. आत्तापर्यंत ही मलिका ८० लाख लोकांनी पाहिली असून मराठी वेबसीरिजच्या इतिहासातील ही सर्वाधिक संख्या आहे. या मालिकेचे आता हिंदी, तमिळ अणि तेलगू भाषांतर होत असून त्याद्वारे ती मराठीखेरीज इतर भाषामध्येही दिसणार आहे,” असे उद्गार निर्माते अणि ‘जिसिम्स’चे प्रमुख अर्जुन सिंग बरन आणि कार्तिक डी निशाणदार यांनी काढले. “समांतर’च्या या यशामुळे निर्माते म्हणून आम्हांला अशाप्रकारच्या अधिकाधिक वेब सीरिजची निर्मिती करण्यासाठी प्रेरणा मिळणार आहे,” असेही ते म्हणाले.

The post ‘समांतर’ या वेब सिरीजला अवघ्या ३ दिवसात मिळाली ८० लाखांहून अधिक प्रेक्षकांची पसंती.. appeared first on MarathiStars.

]]>
https://marathistars.com/news/swapnil-joshi-samantar-web-series-mx-player/feed/ 0 35200
‘NAXAL’ a new Hindi web series on Zee5 directed by Kunal Kohli https://marathistars.com/news/naxal-a-new-hindi-web-series-on-zee5-directed-by-kunal-kohli/ https://marathistars.com/news/naxal-a-new-hindi-web-series-on-zee5-directed-by-kunal-kohli/#respond Wed, 11 Mar 2020 09:55:18 +0000 https://marathistars.com/?p=35186 Kunal Kohli, the renowned Bollywood Director of super duper hit films like Fanaa, Hum Tum, Mujhse Shaadi Karogi, is directing ‘NAXAL‘, his first web series which is getting ready for telecast on Zee5 Television. ‘NAXAL’ also marks the entry of the well-known production house of Arjun Singhh Baran and Kartik Nishandar – GSEAMS (Global Sports […]

The post ‘NAXAL’ a new Hindi web series on Zee5 directed by Kunal Kohli appeared first on MarathiStars.

]]>
AmpedSense.OptimizeAdSpot('AP'); AmpedSense.OptimizeAdSpot('IL'); AmpedSense.OptimizeAdSpot('IR');

Kunal Kohli, the renowned Bollywood Director of super duper hit films like Fanaa, Hum Tum, Mujhse Shaadi Karogi, is directing ‘NAXAL‘, his first web series which is getting ready for telecast on Zee5 Television.

‘NAXAL’ also marks the entry of the well-known production house of Arjun Singhh Baran and Kartik Nishandar – GSEAMS (Global Sports Entertainment And Media Solutions Private Limited) – in Hindi web series. One of the top studios in India with its verticals spread across film, TV and web series productions, talent management and satellite aggregation, GSEAMS has produced many hit films in Marathi like Mogra Phulaalaa, Fugay, Tula Kalnnaar Nahi, Ranangan and presented Bhikari, the films that have created their own imprints in the industry. After unprecedented success in the entertainment in just seven years of its foundation, GSEAMS now ventures into the production of Hindi content.

The lead role in ‘NAXAL’ is played by Rajeev Khandelwal, A popular face and actor in Hindi TV serials and shows and a Bolloywood actor. Rajeev has acted in some of the most successful ones such as Kya Hadsaa Kya Haqeeqat, Kahiin To Hoga among others. He has acted in television shows including Time Bomb 9/11, Sun Leyna, Left Right Left, Reporters to name a few. Rajeev made his Bollywood debut with the film Aamir, which proved to be a turning point in his career. Thereafter he became part of many films like Shaitan, Soundtrack, Table No.21.

With Naxal, the GSEAMS aims at adding another feather in their cap for production of quality content. The series has been conceptualized by Arjun and Kartik in collaboration with Zee5 and is based on the Naxal movement in India. It has a strong base of research done for over one and half years by a team of experts among the top cops and journalists privy to the activities. Many top faces of the web world will join the gang of Naxals as the series unfolds.

Arjun Singhh Baran and Kartik Nishandar of GSEAMS say “We are happy to venture into the web series world of Hindi television. We are fortunate to have Kunal Kohli, one of the most successful directors from Bollywood to lead it and Rajeev Khandelwal in lead actor role. Tarun Katial, CEO, Zee5 has been a great support while producing the show. We are sure the web series will set a different bench mark in this genre of entertainment.”

The post ‘NAXAL’ a new Hindi web series on Zee5 directed by Kunal Kohli appeared first on MarathiStars.

]]>
https://marathistars.com/news/naxal-a-new-hindi-web-series-on-zee5-directed-by-kunal-kohli/feed/ 0 35186
वेबदुनियेत स्वप्नीलचा पहिलाच ‘समांतर’ प्रवास https://marathistars.com/news/samantar-mxplayer-web-series-swwapnil-joshi/ https://marathistars.com/news/samantar-mxplayer-web-series-swwapnil-joshi/#respond Fri, 06 Mar 2020 14:20:27 +0000 https://marathistars.com/?p=35173 मराठी सिनेसृष्टीत एका पेक्षा एक सुपरहिट कलाकृती देणारी दिग्दर्शक आणि अभिनेत्याची जोडी म्हणजे सतीश राजवाडे आणि स्वप्निल जोशी. लवकरच ही जोडी वेबसिरिजच्या निमित्ताने आपल्याला मनोरंजनाची एक दर्जेदार मेजवानी देणार आहेत. मालिका आणि चित्रपट या दोन्ही क्षेत्रात हिट ठरलेली ही जोडी, आता वेबदुनिया गाजवण्यासाठी सज्ज झाली आहे. लवकरच प्रदर्शित होणाऱ्या आणि एम एक्स ओरिजिनलची निर्मिती असणाऱ्या […]

The post वेबदुनियेत स्वप्नीलचा पहिलाच ‘समांतर’ प्रवास appeared first on MarathiStars.

]]>
AmpedSense.OptimizeAdSpot('AP'); AmpedSense.OptimizeAdSpot('IL'); AmpedSense.OptimizeAdSpot('IR');

मराठी सिनेसृष्टीत एका पेक्षा एक सुपरहिट कलाकृती देणारी दिग्दर्शक आणि अभिनेत्याची जोडी म्हणजे सतीश राजवाडे आणि स्वप्निल जोशी. लवकरच ही जोडी वेबसिरिजच्या निमित्ताने आपल्याला मनोरंजनाची एक दर्जेदार मेजवानी देणार आहेत. मालिका आणि चित्रपट या दोन्ही क्षेत्रात हिट ठरलेली ही जोडी, आता वेबदुनिया गाजवण्यासाठी सज्ज झाली आहे. लवकरच प्रदर्शित होणाऱ्या आणि एम एक्स ओरिजिनलची निर्मिती असणाऱ्या “समांतर” या वेबसिरीजमधून स्वप्नील जोशी वेबच्या दुनियेत पाय ठेवणार आहे.

“समांतर” या मराठी एम एक्स ओरिजिनल वेबसिरीजचे दिग्दर्शन सतीश राजवाडे यांनी केले असून, या वेबसिरीज मध्ये स्वप्नील जोशी सोबत तेजस्विनी पंडित सुद्धा दिसणार आहे. या वेबसिरीजमध्ये स्वप्नील कोणाचा तरी शोध घेत आहे. त्याचा या शोधाचे कथानक प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे आहे. ‘समांतर’ वेबसिरीजचा टिझर नुकताच प्रदर्शित झाला असून, येत्या ९ मार्चला या वेबसिरीजचा ट्रेलर प्रदर्शित होणार आहे.

The post वेबदुनियेत स्वप्नीलचा पहिलाच ‘समांतर’ प्रवास appeared first on MarathiStars.

]]>
https://marathistars.com/news/samantar-mxplayer-web-series-swwapnil-joshi/feed/ 0 35173
मराठी प्रेक्षकांना आवाहन करत मृण्मयी देशपांडे, सुव्रत जोशी, सायली संजीव यांनी झळकावले फलक https://marathistars.com/news/man-fakira-marathi-movie-promotion-strategy/ https://marathistars.com/news/man-fakira-marathi-movie-promotion-strategy/#respond Wed, 04 Mar 2020 12:26:18 +0000 https://marathistars.com/?p=35166 मराठी चित्रपटसृष्टीत होत असलेल्या वैविध्यपूर्ण व कल्पक प्रयोगांना मराठी प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. मायबाप प्रेक्षकांनी असाच प्रतिसाद नवीन चित्रपटांनाही द्यावा, यासाठी नेहमीच वेगवेगळ्या क्लृप्त्या अवलंबल्या जातात. सोमवारी पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यलयाजवळ अभिनेत्री आणि दिग्दर्शिका मृण्मयी देशपांडे, सुव्रत जोशी, सायली संजीव या कलाकारांनी हातात फलक घेवून रस्त्यावर उतरत जेव्हा रसिकांना चित्रपटगृहाकडे यायचे आवाहन केले, तेव्हा सर्वांच्याच भुवया उंचावल्या. […]

The post मराठी प्रेक्षकांना आवाहन करत मृण्मयी देशपांडे, सुव्रत जोशी, सायली संजीव यांनी झळकावले फलक appeared first on MarathiStars.

]]>
AmpedSense.OptimizeAdSpot('AP'); AmpedSense.OptimizeAdSpot('IL'); AmpedSense.OptimizeAdSpot('IR');

मराठी चित्रपटसृष्टीत होत असलेल्या वैविध्यपूर्ण व कल्पक प्रयोगांना मराठी प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. मायबाप प्रेक्षकांनी असाच प्रतिसाद नवीन चित्रपटांनाही द्यावा, यासाठी नेहमीच वेगवेगळ्या क्लृप्त्या अवलंबल्या जातात. सोमवारी पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यलयाजवळ अभिनेत्री आणि दिग्दर्शिका मृण्मयी देशपांडे, सुव्रत जोशी, सायली संजीव या कलाकारांनी हातात फलक घेवून रस्त्यावर उतरत जेव्हा रसिकांना चित्रपटगृहाकडे यायचे आवाहन केले, तेव्हा सर्वांच्याच भुवया उंचावल्या.

मराठी अस्मिता जागी व्हावी, मराठी भाषेच्या संवर्धनासाठी मराठी प्रेक्षकांनी या भाषेतील कलाकृतींना पाठबळ द्यावे, अशी अपेक्षा सर्वत्र व्यक्त होत असताना या होतकरू कलाकारांनी उचलेल्या पावलाची सर्वत्र जोरदार चर्चा आहे.mrunmayee deshpande

सोमवारी २ मार्च २०२० रोजी दुपारी १२ वाजता ही मंडळी गुडलक हॉटेल, फर्ग्युसन महाविद्यालय मार्ग, गुडलक चौकाजवळ, डेक्कन जिमखाना येथे चक्क फलक घेवून उभे असलेले पाहायला मिळाले. त्यांच्या हातात अत्यंत कल्पक व लक्ष वेधून घेणारे फलक होते. “आमच्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी आम्ही तुमच्याकडे आलोय, तुम्ही थिएटरमध्ये तरी या…”, “आमचा सिनेमा तुम्ही आई-बाबा, मित्र-मैत्रिणी, प्रियकर-प्रेयसी ते अगदी तुमच्या ‘एक्स’सोबतही पाहू शकता”, “मराठी लोकांनी थिएटरमध्ये जाऊन सिनेमा पहिलाच नाही तर मराठी सिनेमा चालणार कसा?’’, असे फलक घेऊन हे कलाकार हमरस्त्यात उभे होते. लोकही त्यांच्याकडे कुतूहलाने पाहत होते आणि चित्रपटासाठी येण्याचे आश्वासनही या कलाकारांना देत होते. मृण्मयी देशपांडे दिग्दर्शित आणि सुव्रत जोशी, सायली संजीव अंजली पाटील आणि अंकित मोहन यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘मन फकिरा’ येत्या ६ मार्च रोजी प्रदर्शित होत आहे.

The post मराठी प्रेक्षकांना आवाहन करत मृण्मयी देशपांडे, सुव्रत जोशी, सायली संजीव यांनी झळकावले फलक appeared first on MarathiStars.

]]>
https://marathistars.com/news/man-fakira-marathi-movie-promotion-strategy/feed/ 0 35166
“फर्जंद’ च्या अभूतपूर्व यशानंतर निर्माते अनिरबान सरकार यांचा “ऋणानुबंध” https://marathistars.com/news/runanubandh-upcoming-marathi-movie/ https://marathistars.com/news/runanubandh-upcoming-marathi-movie/#respond Mon, 17 Feb 2020 09:19:28 +0000 https://marathistars.com/?p=35122 ‘फर्जंद‘ या सुपरहिट चित्रपटाचे निर्माते अनिरबान सरकार, स्वप्निल पोतदार, महेश जाउरकर आणि अभिनेता, दिग्दर्शक लोकेश गुप्ते “ऋणानुबंध” च्या निमित्ताने एकत्र आले आहेत. लोकेश गुप्ते दिग्दर्शित ‘ऋणानुबंध’ या नव्या चित्रपटाची निर्मिती स्वामी समर्थ मुव्हीज क्रिएशन्स एल.एल.पी. करत असून, वेगळ्या आशय-विषयावरील चित्रपट प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. नुकताच या चित्रपटाचा मुहूर्त पुणे येथे श्री. सुनील आंबेकर (पूर्व राष्ट्रीय […]

The post “फर्जंद’ च्या अभूतपूर्व यशानंतर निर्माते अनिरबान सरकार यांचा “ऋणानुबंध” appeared first on MarathiStars.

]]>
AmpedSense.OptimizeAdSpot('AP'); AmpedSense.OptimizeAdSpot('IL'); AmpedSense.OptimizeAdSpot('IR');

फर्जंद‘ या सुपरहिट चित्रपटाचे निर्माते अनिरबान सरकार, स्वप्निल पोतदार, महेश जाउरकर आणि अभिनेता, दिग्दर्शक लोकेश गुप्ते “ऋणानुबंध” च्या निमित्ताने एकत्र आले आहेत. लोकेश गुप्ते दिग्दर्शित ‘ऋणानुबंध’ या नव्या चित्रपटाची निर्मिती स्वामी समर्थ मुव्हीज क्रिएशन्स एल.एल.पी. करत असून, वेगळ्या आशय-विषयावरील चित्रपट प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. नुकताच या चित्रपटाचा मुहूर्त पुणे येथे श्री. सुनील आंबेकर (पूर्व राष्ट्रीय संघटनमंत्री , अ. भा. वि.प.) तसेच श्री. वैभव डांगे आणि चित्रपटातील कलाकार, तंत्रद्य मंडळी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

‘एक सांगायचंय…’ या चित्रपटाद्वारे लोकेश गुप्ते यांनी आपली दिग्दर्शकीय कारकीर्द सुरू केली होती. या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांची दाद मिळाली होती. आजच्या तरुणांशी संबंधित गंभीर विषय लोकेशनं या चित्रपटात हाताळला होता. आता ‘ऋणानुबंध’ ही एक वेगळी गोष्ट घेऊन लोकेश पुन्हा एकदा सज्ज आहे.

अभिनेता, दिग्दर्शक लोकेश आणि ‘फर्जंद’ चित्रपटाचे
निर्माते ह्या दोघांनीही आपापल्या पहिल्या चित्रपटातून ठसा उमटवणारी कामगिरी केली होती. या चित्रपटातील कलाकारांची नावे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत. ‘ऋणानुबंध’ या नव्या चित्रपटातून ते कोणता विषय आणि गोष्ट घेऊन येतात याची नक्कीच उत्सुकता आहे.

येत्या दिवाळीत १३ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

The post “फर्जंद’ च्या अभूतपूर्व यशानंतर निर्माते अनिरबान सरकार यांचा “ऋणानुबंध” appeared first on MarathiStars.

]]>
https://marathistars.com/news/runanubandh-upcoming-marathi-movie/feed/ 0 35122