तरुणाईच्या जगण्यातील सुसंवादावर भाष्य करणारी रोमँटिक कॉमेडी
‘कॉफी आणि बरंच काही’
आपल्या जगण्यामध्ये नात्यांचे खूप महत्व आहे. ही नाती आयुष्यामध्ये जपण्यासाठी त्यांच्यामध्ये सुसंवाद असणे फार गरजेचे असते.
आधीच्या पिढ्यांमधील नात्यांमध्ये असलेला मायेचा ओलावा, आजच्या नात्यांमध्ये कुठे तरी हरवला आहे. फेसबुक ट्विटर चॅटींगच्या माध्यमातून कृत्रिमरीत्या संवाद साधान्याकडे सध्याच्या पिढीचा कल असतो. तरीही आजची जनरेशन नात्यांबद्दल फारच खोलात जाऊन विचार करते. अशाच युवा पिढीच्या जगण्यावर भाष्य करणारा आणि निखळ मनोरंजनाचा आस्वाद देणारा कॉफी आणि बरंच काही हा चित्रपट रुपेरी पडद्यावर आकारास येत आहे.
‘मोशन स्केप एण्टरटेनमेण्ट’ या संस्थेची निर्मिती असलेला आगामी कॉफी आणि बरंच काही या चित्रपटातून युवा वर्गाच्या जगण्यामधील गोडवा रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. प्रकाश कुंटे आणि राहुल ओदक यांच्या ‘मोशन स्केप एण्टरटेनमेण्ट’ ची निर्मिती व राजेंद्र शिंदे यांच्या सुप्रीम मोशन आणि संदिप केवलन यांच्या एस.के.प्रॉडुक्शन या संस्थांची सहणिर्मिती असलेल्या ‘कॉफी आणि बरंच काही’ या चित्रपटाचे दिग्दर्शन स्वतः प्रकाश कुंटे करत आहेत.नात्यांमधील सुसंवादातून घडणारी रोमँटिक कॉमेडी ड्रामा चित्रपटातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
कॉफी आणि बरंच काही या चित्रपटा‘धून अनेक प्रसिद्ध कलाकार पडद्यावर एकत्र येत आहेत. या चित्रपटात वैभव तत्ववादी, प्रार्थना बेहरे, दिलीप प्रभावळकर, सुहास जोशी, भुषण प्रधान हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. त्यांच्यासोबत अविनाश नारकर, संदेश कुलकर्णी, अनुजा साठे, बाप्पा जोशी असे अनेक दिग्गज कलाकार काम करत आहेत. अनेकविध कलाकारांच्या उत्कृष्ट भूमिका असलेला हा चित्रपट पडद्यावर धमाल उडवून देणार आहे.
प्रख्यात साहित्यिक व कवी मंगेश पाडगावकर यांची कविता ह्या चित्रपटात वापरण्यात आली असून ती संगीतबद्ध करण्याचे शिवधनुष्य संगीतकार आदित्य बेडेकर यानी लीलया पेललेले आहे. लवकरच ह्या चित्रपटातील गाणी युवा पिढीसमोर सादर करण्यात येणार आहेत.
या चित्रपटाचे संपुर्ण चित्रीकरण पुणे परिसरात होणार असून सध्या पुण्यातील कोरेगाव पार्क येथील संस्कृती लाईफ स्टाईल येथे या चित्रपटाचे चित्रीकरण धड्याक्यात सुरू आहे. पुढील महिन्यात या चित्रपटाचे चित्रीकरणाचे शेड्युल्ड लवकर पूर्ण करून हा चित्रपट रुपेरी पडद्यावर सादर करण्यात येईल अशी माहिती राहुल ओदक यांनी दिली. आकर्षक कथानक, उत्तम पात्ररचना यांचा सुरेख संगम या चित्रपटात साधलेला आहे. एकंदरीतच “कॉफी आणि बरंच काही” या चित्रपटाची चव रसिकांच्या जीवनात निश्चितच गोडवा
आणेल यात शंका नाही.