BP (Balak Palak) Movie Review

Balak – Palak Marathi Movie Review,Check Rating

Production Company : Viva InEn & Ravi Jadhav Films and Mumbai Film Company
Producers : Riteish Deshmukh, Uttung Hitendra Thakur
Director & Co-producer : Ravi Jadhav
Cast : Prathamesh Parab,Shashwati Pimplikar,Madan Devdhar,Bhagyashree Shankpal,Rohit Phalke,Sai Tamhankar,Subodh Bhave,Amruta Subhash,Kishor Kadam,Avinash Narkar,Vishakha Subhedar,Anand Ingale,Satish Tare,Supriya Pathare
Release date : 4th January 2013
Author of the Story : Ambar Hadap & Ganesh Pandit
Director of Photography : Mahesh Limaye
Director of Music : Vishal and Shekher
Lyrics : Guru Thakur, Ravi Jadhav
Executive Producer & Costume Designer : Meghana Jadhav
Screenplay writer/ Script writer : Ravi Jadhav, Ambar Hadap & Ganesh Pandit
Art Director : Dilip More, Santosh Phutane
Editor : Jayant Jathar
Background Music : Chinar and Mahesh

Review By Maharastra Times – 
Rating – ***1/2

चाळीतली नेहा इतरांपेक्षा मॉडर्न विचारांची आणि आचारांची आहे. नवे फॅशन ट्रेंड फॉलो करणारी, बाहेर पडताना नट्टा-पट्टा करून बाहेर पडणारी अशी ही नेहा. तिचं वय अवघं २२ वर्षं. दिसायला सुंदर. व्यक्तिमत्त्वाने पुष्ट आणि आकर्षक. त्यामुळे ती बाहेर पडली की भल्याभल्यांचा रस्ता चुकवणारी. तिच्यापेक्षा वयाने लहान असलेल्या चाळीतल्या सर्वांची ही नेहाताई. नेहालाही हे सर्व छोटे मित्र लहान भावासारखे. दिवसामागून दिवस जात असतात आणि एका दिवशी याच मुलांमधला अवघ्या १०-१२ वर्षांचा भाग्या एकदिवस तिचा रस्ता अडवतो आणि काही कळण्यापूर्वीच तिला थेट ‘ आय लव्ह यू ‘ म्हणून पळून जातो.

‘ लव्ह ‘ म्हणजे काय हे भाग्याला माहीत नाही.

Ritesh Deshmukh & Geneliya At Premiere Of BP-Balak Palak
Ritesh Deshmukh & Geneliya At Premiere Of BP-Balak Palak

आय लव्ह यू म्हणजे नेमकं काय याचीही कल्पना त्याला नाही.

आता ती भावना नेहाला सांगितल्यानंतर पुढं काय करायचं तेही त्याला माहीत नाही.

नेहा आपल्याला का आवडते एवढंच भाग्याला माहितीये. इन फॅक्ट भाग्याला नेहा आवडतच नाही. नेहाच्या जागी तशीच दिसणारी प्रिया, स्मिता, अमृता अशी कोणीही आली असती तरी त्याला ती तेवढीच आवडली असती हे भाग्याला लक्षातच येत नाहीय. बरं, ते लक्षात आणून द्यायलाही त्याच्यासोबत कोणी नाही. कारण भाग्याच्या सगळ्याच मित्रांना ‘ अशा ‘ मैत्रिणी आहेत. आणि मैत्रिणींना ‘ असे ‘ मित्र. त्यामुळे भावनेची योग्यता तपासून पाहण्याची तसदी त्याने घेतलेली नाहीय. त्यामुळे त्याला नेहा जरी आवडत असली तरी त्याच्याजवळ आता सुषमा आहे. शिवाय तिलाही भाग्या मिळाला. कारण, भाग्यासारखं आकर्षण सुषमालाही आहेच की. याच भावनेला प्रेम म्हणतात असं भाग्या-सुषमाला कोण्या अनुभवी मित्राने सांगिलंय. त्यामुळे दोघे आकंठ प्रेमात बुडालेत. शाळा सुटल्यानंतर असे कित्येक भाग्या-सुषमा क्लासच्या, अभ्यासाच्या नावाखाली बसस्टॉपवर, स्टेशन्सवर, मॉलमध्ये शक्य तेवढी जवळीक साधून प्रेम व्यक्त करत असतात. या जवळिकीसाठी आवश्यक ‘ ज्ञान ‘ टीव्ही, इंटरनेट, मासिकातून मिळवत असतात. एक दिवस भावनेचा बांध फुटतो आणि पाहता पाहता ‘ या ‘ प्रेमाचा एका क्षणात ‘कडेलोट ‘ होतो. कारण, ‘ अशा ‘ प्रेमाला नेमकं काय म्हणायचं हे वडिलकीच्या नात्याने सांगणारं आज भाग्याकडे कोणी नाही. वयानुरूप तयार होणाऱ्या भावनेला लगाम घालून तिला कसं नीटस वाढवायचं याचं शिक्षण घ्यायची व्यवस्था भाग्या-सुषमा शिकत असलेल्या पुस्तकांत नाही. चहूबाजूंनी विद्युतवेगाने अंगावर येणाऱ्या माहितीच्या पुंजक्यांमधलं नेमकं काय, कसं आणि किती घ्यायचं हे सांगणारी व्यवस्था या मुलांच्या कुटुंबांमध्ये नाहीय. न पेक्षा हे खजिनेच बुजवून टाकण्याकडे भाग्याच्या कुटुंबाचा कल आहे. रवी जाधवचा ‘ बीपी ‘ तथा ‘ बालक-पालक ‘ हा कुटुंबामध्ये अभावानेच आढळणाऱ्या पूर्णतः मोकळ्या अशा मैत्रीपूर्ण भावनिक नात्याचा आग्रह धरतो.

हा मेसेज देण्यासाठी दिग्दर्शकाने निवडलाय तो १९८३ चा काळ. एकाच चाळीत राहणाऱ्या भाग्या, अव्या, डॉली, चिऊ यांची जबरी मैत्री. एकाच शाळेत शिकणाऱ्या या चौकडीला एकमेकांशिवाय करमत नाही. अभ्यासापासून खेळापर्यंत सगळ्या गोष्टी करायच्या त्या मिळून, असा यांचा अलिखित नियम. नव्या गोष्टींचं कुतूहल.. शिकण्याची इच्छा ही चौघांनाही. आणि एक दिवस चाळीतल्याच एका मुलाच्या ताईला चाळीतलं घर सोडावं लागतं. ती का गेली, कुठे गेली याचं कोणतंही उत्तर चाळीतल्या वडिलधाऱ्यांकडून दिलं जात नाही. उलट ही गोष्ट शक्य तितकी लपवण्याकडे चाळकऱ्यांचा असलेला कल या मुलांच्या नजरेतून सुटत नाही. अखेर या पालकांवर अवलंबून न राहता त्याचं कारण शोधण्याचा निर्धार हे बालक करतात आणि ‘ बालक-पालक ‘ आकाराला येतो.

दिग्दर्शकाने या सिनेमाद्वारे ‘ नाजूक ‘ विषयाला स्पर्श केला आहे. त्याचं हे धाडस दखलपात्र आहे. दिग्दर्शकाला जाहिरात जगतातला दांडगा अनुभव असल्याने कमीत कमी वेळात एखादा विषय तितक्याच आकर्षक वेष्टनात गुंडाळून लोकांपर्यंत कसा पोहोचवायचा याचं भान त्याला आहे. त्याच्या या हातोटीमुळेच हा सिनेमा उत्कंठावर्धक आहे. तो प्रेक्षकांना खिळवूनही ठेवतो. ‘ नटरंग ‘, ‘ बालगंधर्व ‘ यांनंतर रवी जाधव-महेश लिमये ही दिग्दर्शक-सिनेमेटोग्राफर या जोडीची कमाल या सिनेमातही दिसते. कलादिग्दर्शकाच्या साथीने या दोघांनी ३० वर्षांपूर्वीचा काळ उभा केला आहे. परंतु, सिनेमातल्या या चार मित्र-मैत्रिणींचा वावर हा आजच्या काळातला वाटतो. परिणामी सिनेमातला काळ जुना असला, तरी या सिनेमातल्या सर्व प्रमुख पात्रांच्या चेहऱ्यावर आज टीव्ही, इंटरनेटमुळे आलेला स्मार्टनेस दिसतो. केवळ दिसणंच नव्हे, तर विशेषतः नेहाच्या पेहरावामध्येही ही विसंगती दिसते. परंतु, आटोपशीर पटकथेमुळे दर प्रसंगांमधून अपेक्षित असलेला मेसेज पोहोचवण्यात दिग्दर्शक यशस्वी झाला आहे. पौगंडावस्थेत असलेलं ‘ कुतूहल ‘ शमल्यानंतर मुलांचा अनेक गोष्टींकडे, नात्याकडे बघण्याचा बदललेला दृष्टिकोन दिग्दर्शकाने अचूक टिपला आहे. चांगल्या पटकथेमुळे दिग्दर्शक देऊ पाहात असलेला डोस प्रेक्षकाला बरोबर मिळतो. त्याला चांगली साथ दिलीय ती संगीतकार आणि पार्श्वसंगीतकारांनी. ‘ ट्विंकल ट्विंकल ‘ या गाण्याचा अपवाद वगळता पार्श्वसंगीतही दखलपात्र आहे. संकलनही नेटकं.

Read Full Review – Maharashtra Times

Review By lokamat News Paper – 
Rating – ****

छोट्या मुलांचे भावविश्‍व… त्यांच्या मनात दाटली असते अनेक प्रश्नांची गुंतागुंत. अशाच एका प्रश्नाच्या शोधात त्यांचं मन चेतवलं जातं. त्या चेतलेल्या मनावर हळुवार पण तेवढीच प्रभावी फुंकर ‘बीपी’ (बालक-पालक) या मराठी चित्रपटात घातली आहे. बोल्ड विषय असूनही तो संयमितपणे मांडण्यात रवी जाधव या तरुण दिग्दर्शकाने यश कमावले आहे.

Jacqueline Fernandez At Premiere Of BP-Balak Palak
Jacqueline Fernandez At Premiere Of BP-Balak Palak

पौगंडावस्थेतील मुलांच्या लैंगिक समस्यांवर हा चित्रपट आधारलेला आहे. कथा १९८३ च्या कालखंडातील असली तरी ती आजच्या भयाण वास्तवाशी जोडली आहे. तेव्हा मिळणारी ईल पुस्तके, भाड्याने मिळणारे व्हीसीडी प्लेअर, व्हिडीओ कॅसेट आणि आताच्या मुलांना मोबाइलवर, नेटवर घरबसल्या सहज मिळणार्‍या साहित्याच्या वापराला र्मयादा कोण घालणार, हा प्रश्न पालकांची चिंता वाढविणारा आहे.
चाळीमध्ये मुलांचे बदलणारे भावविश्‍व, त्यांचे वागणे, त्यांच्या संशयास्पद हालचालींवर नजर ठेवणार्‍या कदम काका (किशोर कदम)ची भूमिका या चित्रपटाचा महत्त्वाचा धागा आहे. आजच्या फ्लॅट संस्कृतीमध्ये असे कदम काका कुठे शोधणार? चाळीत किंवा सोसायटीत कदम काकांसारख्या तिसर्‍या माणसाशी आपुलकीच्या, विश्‍वासाच्या नात्याची उणीवही चित्रपटात अधोरेखित झाली आहे.
संवाद आणि अनेक दृश्यांमधून खुसखुशीत पद्धतीने गंमतजंमत करीत हा अवघड आणि बोल्ड विषय रंगविला आहे. मुलांना पडलेल्या प्रश्नाचे उत्तर शोधतानाच्या अनेक प्रसंगांनी धमाल उडवली आहे. हळुवार चिमटेही काढले आहेत. चिऊची आई (सुप्रिया पाठारे) गोमूत्र शिंपडत असताना चिऊ विचारते, ‘आई, गोमूत्र पिल्याने काय होते?’ आई सांगते, ‘छान असतं, पवित्र असतं.’ लागलीच ती ‘शेण खाल्लं तर?’ असा प्रश्न विचारते आणि ‘नको त्या गोष्टी विचारू नकोस’, म्हणत तिलाच फटकारते.

Read Full Review – Lokmat.com

 

Tags

balak palak movie songs download, balak Palak, balak palak full movie, बालक पालक चित्रपट मुले, बालक पालक मराठी चित्रपट, bala palak movie dawnlod, balak palak movie download, balak palak full movie download, balak palak marathi full movie, balak palak marathi movie, balak palak marathi film, balak palak review, बालक पालक चित्रपट मराठी,