A Every person is in search of blissful ending, but for that one has to write their own script. `Samhita’ is all about that . MarathiStars Reader Ruturaj Vaidya writes about Samhita The Script. Check out his view –
- Review : Samhita – The Script (संहिता)
- Produced By : Mukta Arts, Ashokk Films
- Directed By : Sumitra Bhave – Sunil Sukthankar
- Written By : Sumitra Bhave
- Screenplay By : Sumitra Bhave
- Starring : Milind Soman, Devika Daftardar, Rajeshwari Sachdeva, Uttara Baokar, Jyoti Subhash, Sarang Sathye, Ashwini Giri, Dr. Sharad Bhutadia, Dr. Shekhar Kulkarni, Neha Mahajan
सुमित्रा भावे आणि सुनिल सुकथनकर या जोडगोळीचा आणखीन एक अप्रतिम सिनेमा म्हणजेच संहिता. संहिता म्हणजेच सिनेमाची स्क्रिप्ट; एका सिनेमाच्या स्क्रिप्ट च्या भोवताली आणि त्यात गुंतलेल्या तीन चार कथा किंवा कुटुंबं. बर्याचदा किंबहुना कायमच आपण एखादी घटना किंवा गोष्ट वाचतो, ऐकतो आणि त्या घटनेला स्वत:भोवती गुंफत जातो जणू ती आपली स्वतःचीच गोष्ट आहे. संहिता सुद्धा अशीच एक गोष्ट आहे जिच्यामध्ये नायिका स्वत:ला आणि तिच्या आजूबाजूच्यांना सामावून कथेत घेत जाते.
रेवती साठे (देविका दफ्तरदार), राष्ट्रीय पुरस्कार विजेती शॉर्टफिल्म मेकर जी एकआजच्या युगातली धडाडीची स्त्रीआहे जीला स्व:ताची ओळख आहे, जीला स्व:ताचे करिअर अजून मोठे बनवायचे आहे. पण त्याचबरोबर तिचं संसारिक जीवन याच कारणामुळे बिघडलं आहे ते इतकं, कि तिचा आणि तिचा बिझनेसमन नवरा रनवीर (मिलिंद सोमण) हे घटस्फोटाच्या उंबरठ्यावर आहेत. शिरीन (ज्योती सुभाष) एका नामांकित फिल्ममेकर (डॉ. शरद भुताडिया) ची बायको, तिला आपल्या अंथरुणाला खिळलेल्या नवर्याचा ड्रीम प्रोजेक्ट आणि शेवटची इच्छा असलेल्या कथेवरजी तारा देऊस्कर (उत्तरा बावकर) यांनी लिहिली आहे त्यावर चित्रपट बनवायचा आहे. त्यासाठी शिरीन, रेवती ची दिग्दर्शिका तसेच संहिता लेखक म्हणून आणि नायिका म्हणून एक प्रसिध्द नायिका हेमांगीनीची (राजेश्वरी सचदेवा) निवड करते. शिरीनला वरवर हि कथा आठवतेय आणि तिच्या मते हि एक समर्पणाची गोष्ट आहे, तर मूळ कथा लेखिका तारा देऊस्करांना वाटते कि हि एका शोषणाची कथा आहे. या दोघींच्या दृष्टीकोनातून आणि लेखीकेसोबत काही काळ हि कथा जिथे घडली त्या राजवाड्यात जाऊन रेवती हि संहिता गुंफू लागते ती स्वतःभोवतीच. रेवती, शिरीन, तारा, हेमांगिनी मग बनतात रेवतीच्या संहितेमधल्या राणी मालविका, रैनाबी, मोठ्या आऊसाहेब, आणि स्वर्गीय गळ्याची रागिणी, आणि रागीणीच्या स्वराच्या आणि सौंदर्याच्या प्रेमात पडतात ते महाराज म्हणजेच रेवतीचा नवरा रणवीर! रेवती आणि तिच्या नवर्याचे तणावाचे सबंध, शिरीनची नवर्याला वाचवण्याची धडपड तर हेमांगिनीची तिच्या प्रियकराच्या मुलीला सामावून आणि समजून घेण्याची कसरत आणि मूळ कथा अशा एकाचवेळी अनेक पठड्यावर चित्रपट सरकत राहतो.पण मूळ पठडी न सोडता बाकीच्या कथा गुंफण्यात दिग्दर्शिका सुमित्रा भावे आपल्या हातखंड्याने यशस्वी झाल्या आहेत.
एकमेकात गुंफणारी नाती आणि त्यांच्या वेगवेगळ्या तर्हा दिग्दर्शिकेने अशा सहजरित्याएकत्रित केल्या आहेत कि चित्रपट कुठेच आपला ट्रॅक सोडत नाही. दिग्दर्शानासोबातच तांत्रिक बाजूमध्येसुद्धा चित्रपट उठावदार आहे, राजे-महाराजे आणि राण्यांचे वेश, चाल, अदब आणि चित्रपटाचे सेट्स, वाहने, इ. मध्ये राजपण अगदी तंतोतंत आणण्यात सुमित्रा भावे यशस्वी. दरबारी संगीत ज्यापायी एक राजा वेडा होतो ते संगीत साधण्यात शैलेंद्र बर्वे यशस्वी झालाय. परंतु त्या सांगितला खरा साज चढवलाय तो आरती अंकलीकर यांनी. आरती अंकलीकारांच्या स्वर्गीय आवाजाने खरंच जादू केली आहे. चित्रपटाचे मुख्य शिलेदार म्हणजेच सगळे कलाकार दोन दोन भूमिका निभावून त्यांनी आपल्या अभिनय क्षमतेची चुणूक दाखवली आहे. मुख्य नायिका देविका दफ्तरदारच्या दिग्दर्शिका आणि राणी मालविका दोन्ही वेगवेगळ्या भूमिका अप्रतिम, मिलिंद सोमणचा व्यथित लग्न वाचवणारा नवरा आणि रुबाबदार राजेशाही आणि संगीत, प्रेमात बुडालेला राजा खरंच राजबिंडा तर राजेश्वरी सचदेवाची समंजस प्रभावी हेमांगिनी आणि सौंदर्यवती, लहेजा घेऊन गाणारी राजदरबारी गायिका सुरेखच, सोबत ज्योती सुभाष आणि उत्तरा बावकर यांचाही उत्तम दोन्ही आघाड्यावर उत्तम अभिनय चित्रपटाला एक नवी उंची देतो.
काही खटकण्यासारख्या गोष्टी म्हणजे राजेश्वरी आणि मिलिंद सोमण चे जाणवून येणारे वय. खासकरून राजेश्वरीच्या चेहऱ्यावर सुरकुत्या दिसत असताना वारंवार क्लोजअप शॉटस घेण्याचा मोह का केलाय हे कळत नाही. पण राजेश्वरी ने तिच्या सुंदर अभिनयाने तो झाकोळून टाकण्याचा केलेला प्रयत्नही वाखाणण्याजोगा. तर असा हा राजेशाही आणि त्यासोबतच आजच्या घडीच्या कौटुंबिक जीवनांवर प्रकाश टाकणारा संहिता न चुकाविण्यासारखा सिनेमा आहे. असे सिनेमे रोज घडत नाहीत.
Ruturaj Vaidya is movie fanatic, critic, technology expert, nature enthusiast, traveller and blogs at Flirtingwithmovies .You can check MarathiStars.com’s review here – Samhita – The Script Review.