नाती आयुष्य व्यापून टाकणारी, जगण्याला सुंदर करणारी, काही नाती सहवासाने बहरतात. काही दूर असूनही मनाच्या जवळ असतात. काही लादली जातात, तर काही क्षणभरात होतात. रोजच्या गर्दातही जुळतात अथवा फेसबुकच्या क्लिकवर देखील. असे हे नाते कसेही असले तरी त्यात प्रेमाचा स्पर्श असेल तरच हा नात्यांचा खेखेळ अधिक बहरून येतो. नात्यांच्या अशाच धम्माल गडबडगुंडयावर बेतलेला ‘हुतूतू’ हा नवा मल्टीस्टारर चित्रपट घेऊन कांचन अधिकारी प्रेक्षकांच्या भेटीस येताहेत. एकमेकांना धोबीपछाड देत रंगलेली त्यांची आगामी मनोरंजक कलाकृती प्रेक्षकांचे पुरेपूर मनोरंजन करणार आहे.
हर्षवर्धन भोईर व भाऊसाहेब भोईर निर्मित, कांचन अधिकारी दिग्दर्शित ‘हुतूतू’ या धमाल कौटुंबिक चित्रपटात कलाकारांची तगडी फौज आहे. अशोक सराफ, वर्षा उसगांवकर, प्रदीप पटवर्धन, कांचन अधिकारी, अनंत जोग या दिग्गज कलाकारांसोबत जितेंद्र जोशी, हेमंत ढोमे, नेहा पेंडसे, मानसी नाईक, जयवंत भालेकर, अतुल तोडणकर, संजय खापरे या साऱ्यांच्या अभिनयाची भन्नाट जुगलबंदी ‘हुतूतू’ मध्ये पाहता येणार आहे.
त्याग आणि समर्पणाला प्रेम मानणा-यांचा एक संघ आणि प्रेम मिळवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणा-या धुंद पिढीचा दुसरा संघ असा हा सामना रंगणार आहे. प्रेम मिळवण्यासाठी जिव्हाळ्याच्या नात्यांमध्ये हुतूतू कसा रंगत जातो आणि त्यातून उडणारा गोंधU याचं धमाल चित्रण म्हणजे ‘हुतूतू’. प्रसंगानुरप विनोदाची बेछूट आतिषबाजी या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. बNयाच वर्षानंतर कांचन अधिकारी या चित्रपटातून अभिनय करताना दिसणार आहे हे आणखी एक विशेष. या चित्रपटाचं लेखन आशिष पाथरे यांनी केलं असून सिनेमॅटोग्राफी सुरेश देशमाने यांची आहे. सध्या या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू असून लवकरच तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.