Diwali Celebration on Set Of Marathi Movie Sou Shashi Deodhar

Diwali Celebration on Set Of Sou Shashi Deodhar

सौ. शशी देवधर या आगामी मराठी चित्रपटाद्वारे हिंदीतील प्रख्यात अभिनेत्री शिल्पा शिरोडकर रणजीत यांनी मराठी चित्रपट निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले आहे. यानिमित्ताने शिल्पा आणि अपरेश रणजीत या दाम्पत्याने आपले कुटुंबीय आणि चित्रपटाच्या टीमसोबत उत्साहात दिवाळी साजरी केली.

पारंपारिक पद्धतीची पूजा, रांगोळी, पणत्या , आकाशकंदील या सोबतच सर्वांनी रोषणाईच्या फटाक्यांचा मनमुराद आनंद घेतला. एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा देत सगळ्यांनी फराळाचा आस्वाद घेतला. अजिंक्य देव, सई ताम्हणकर, तुषार दळवी या कलाकारांसमवेत दिग्दर्शक अमोल शेडगे, सह निर्माते सुरेश पै, निर्माते अपरेश रणजीत – शिल्पा शिरोडकर रणजीत, कृष्णा शेट्टी तसेच चित्रपटाचे तंत्रज्ञ उपस्थित होते.

Tags

shilpa shirodkar latest, shilpa shirodkar family photo,