Marathi Celebs GudiPadwa Celebration on Set Of Hu Tu Tu

‘हुतूतू’ टीमचे गुढीपाडवा सेलिब्रेशन

गुढीपाडव्याचे औचित्य साधत ‘हुतूतू’ या आगामी मराठी सिनेमातील कलाकारांनी गुढी उभारली. अशोक सराफ, वर्षा उसगावकर, जितेंद्र जोशी, हेमंत ढोमे आणि मानसी नाईक या कलाकारांसह निर्माते भाऊसाहेब भोईल, दिग्दर्शिका कांचन अधिकारी यांनी वांद्रे येथील पोपले ज्वेलर्स येथे नवीन संकल्पनांची गुढी उभारत नवीन वर्षाचे दणक्यात स्वागत केले.
शर्मिलाताई ठाकरे यांच्या उपस्थितीत ‘हुतूतू’ सिनेमातील कलाकारांनी गुढीचं पूजन करुन सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. चित्रपटसृष्टीतील आणि राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

नात्यांच्या धमाल गडबडगुंड्यावर बेतलेला हुतूतू हा धमाल मल्टीस्टारर सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.