Gangubai and Chu Now on big Screen

Gangubai and Chu Now on big Screen

Gangubai and Chu Now on big Screen..

गंगुबाई आणि छु ची धमाल आता मोठ्या पडद्यावर

छोट्या पडद्यावरील मालिका आणि रंगभूमीवरील नाटक अशा माध्यमातून प्रेक्षकांना खळखळून हसवणारीआणि सोबत सामाजिक भानही जपणारी गंगुबाई आणि छु या जोडगोळीची धमाल आता मोठ्या पडद्यावर बघायला मिळणार आहे.

छोट्या पडद्यावरील मालिका आणि रंगभूमीवरील नाटक अशा माध्यमातून प्रेक्षकांना खळखळून हसवणारीआणि सोबत सामाजिक भानही जपणारी गंगुबाई आणि छु या जोडगोळीची धमाल आता मोठ्या पडद्यावरबघायला मिळणार आहे. ‘कुमारी गंगुबाई नॉन मॅट्रिक‘ याच नावाने येणाऱ्या या चित्रपटात निर्मिती सावंतआणि पंढरीनाथ कांबळे सोबत नागेश भोसले आणि आनंद इंगळे यांच्या अभिनयाचीही विनोदी जुगलबंदीबघायला मिळणार आहे. विद्याधर पाठारे यांच्या ‘आयरिस प्रोडक्शन’ची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचीप्रस्तुती ‘व्हायकॉम १८’ ची असणार आहे. मालिका आणि नाटकाप्रमाणे या चित्रपटाची कथा-पटकथा-संवाद -दिग्दर्शन राजेश देशपांडे यांचं असणार आहे. २७ सप्टेंबर पासून हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

साधारण १० वर्षापूर्वी छोट्या पडद्यावर गंगुबाई आणि छु ची जोडी अवतरली होती. आपल्या आजूबाजूच्यालोकांना येणाऱ्या अडचणी गंगुबाई आपल्या स्टाईलने सोडवायची आणि या कामात छु तिला साथ द्यायचा.तिच्या या कामगिरीमुळे गंगुबाईने लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वाना आपलं केलं होतं . साप्ताहिक मालिकेतजास्तीत-जास्त भागांचा विक्रमही गंगुबाई ने आपल्या नावावर नोंदवला होता त्यानंतर याच मुख्य पात्रांना घेऊनआलेल्या नाटकालाही प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता . या दोन्ही माध्यमात लोकप्रियतामिळवल्यानंतर आता ही जोडी चित्रपटाच्या मोठ्या पडद्यावर अवतरणार आहे. एखादी कलाकृती मुख्य कलाकारकायम ठेऊन एकाच निर्मात्या आणि दिग्दर्शका कडून तीनही माध्यमात सादर करण्याचा एक आगळा-वेगळाविक्रमही गंगुबाईच्या टीम ने नोंदवला आहे हे विशेष. मालिका आणि नाटकामध्ये सामाजिक समस्या सोडवतत्यावर चिमटे काढत भाष्य करण्याचं काम गंगुबाई ने केलं आहे. आता चित्रपटात गंगुबाई सामाजिक प्रश्नसोडवणार आहे ते थेट राजकारण्याच्या माध्यमातून. आपल्या लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी गंगुबाईनिवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे. सामाजिक आणि राजकीय प्रश्नांची जाण आणि त्यावर मार्मिक पद्धतीनेकोट्या करत चिमटे काढणे यात लेखक दिग्दर्शक राजेश देशपांडे यांचा हातखंडा आहे आणि असेच विनोदी प्रसंग या चित्रपटात प्रेक्षकांना बघायला मिळणार आहेत.

कुमारी गंगुबाई नॉन मॅट्रिक‘ या चित्रपटाला शैलेंद्र बर्वे यांचं संगीत असून यातील गीते राजेश देशपांडे यांनीलिहिली आहेत तर सुजित कुमार आणि राजेश बिडवे यांचं नृत्य दिग्दर्शन आहे. आपल्या खास शैलीसाठी प्रसिद्धअसलेले संजय जाधव यांनी या चित्रपटाचं छायांकन केलं आहे. मराठीमध्ये ‘झपाटलेला २’ हा पहिला थ्रीडीचित्रपट आणि ७२ मैल एक प्रवास सारखी आशयघन कलाकृती यशस्वीपणे सादर करणाऱ्या ‘व्हायकॉम १८ मोशन पिक्चर्स’ ने याही चित्रपटाच्या प्रस्तुतीची जबाबदारी सांभाळली आहे. छोट्या पडद्यावरगंगुबाई सोबतच अग्निशिखा आणि इतर बऱ्याच लोकप्रिय मालिका देणाऱ्या विद्याधर पाठारे यांच्या ‘आयरिसप्रोडक्शन’ ने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. येत्या २७ सप्टेंबरपासून ‘कुमारी गंगुबाई नॉन मॅट्रिक’ हाचित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

Tags

chu chu tv marathi,