Riteish Deshmukh to act in Nishikant kamat’s Marathi Movie “Lai Bhaari”

निशिकांत कामतनी मराठीत आणि हिंदीत “डोंबिवली फास्ट” आणि “मुंबई मेरी जान” सारखे लोकप्रिय सिनेमा दिले आणि आता ते “लई भारी” नामक नवीन चित्रपट घेऊन येणार आहेत.

दिर्ग्दर्शक निशिकांत ह्या चित्रपटात “रितेश देशमुख” ला प्रमुख भूमिकेत घेऊन येत आहेत, हा चित्रपट भरपूर अक्शन आणि मनोरंजन युक्त असणार आहे.
रितेश देशमुखने “बालक पालक” चित्रपटाची निर्मित केल्यानंतर तो मराठी चित्रपटात काम करण्यास इच्छुक होता, आता त्याची हि इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे,  हा चित्रपट महाराष्ट्रातील एका लोकप्रिय नेत्यावर आधारित असेल. रितेशच मराठी चित्रपटात पदार्पण होणार आहे, त्याचे चाहते हि बातमी ऐकून नक्कीच खुश होतील.