‘Khara Saangu Khota Khota’ to release on 20th Dec 2013

आजवर विविधरंगी भूमिकांतून आपल्या अभिनयाची आतिषबाजी करणारे, मराठीतील दिग्गज कलाकार एकत्र असलेला ‘खरं सांगू खोटं खोटं’ हा धमाल मराठी चित्रपट 20 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, सयाजी शिंदे आणि निर्मिती सावंत यांच्या अभिनयाची अनोखी भट्टी या चित्रपटात जमून आली आहे. शिवाय या चित्रपटातून अनलेश देसाई आणि त्रिशला शहा ही नवोदित देखणी जोडी रपेरी पडदयावर पदार्पण करतेय. ‘अभिरूची फिल्मस’ प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती ‘सराव प्रॉडक्शन’ या निर्मिती संस्थेने केली आहे.

चित्रपटात सगळ्यांचे लाडके अशोक मामा निवडणुकीला उभे राहिलेले दिसणार आहेत आणि त्यांना तोडीची टक्कर असणार आहे सयाजी शिंदे या दमदार अभिनेत्याची. सोबत आपल्या विनोदी शैलीने निर्मिती सावंत यादेखील धमाल उडवून देणार आहेत. या अनुभवी कलावंतांसोबत अनलेश आणि त्रिशला यांनी जरी पहिल्यांदा काम केले असले, तरी आपल्या अभिनयाने त्यांनी भूमिका उत्तमरितीने वठविल्या आहेत. हेमांगी वेलणकर, दिपज्योती नाईक यांच्या देखील यात भूमिका आहेत. छायाचित्रण मंजुनाथ बी. नायका यांनी केले असून संकलन संजीव नाईक, उमेश राणे यांनी केलंय. रामचंद्र सडेकर यांच्या ‘तुझं माझं जमेना’ या कादंबरीवर चित्रपटाची कथा बेतली आहे.

मुंबई, सातारा, वाई, महाबळेश्वरर, कोकण सारख्या नयनरम्य लोकेशन्सवर चित्रीत झालेला ‘खरं सांगू खोटं खोटं’ हा धम्माल विनोदी चित्रपट येत्या 20 डिसेंबरला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होतोय.

1 COMMENT