‘मंगलाष्टका वन्स मोअर’ च्या सेटवर गणपती बाप्पा मोरया
आपल्या सर्वांचे आराध्यदैवत असलेल्या श्री गजाननाचा उत्सव सध्या जल्लोषात सुरू आहे. अनेकविध देखावे, विद्युत रोषणाई, विविध सांस्कृतिक उपक्रम या द्वारे
गणेशोत्सव सगळीकडे साजरा केला जात आहे. अशा या १४ विद्या आणि ६४ कलांनी संपन्न असलेल्या गणेशाचा उत्सव मराठी चित्रपटांनीही अनेकदा साजरा केला
आहे. त्याच परंपरेला पुढे नेत ‘मंगलाष्टका वन्स मोअर‘ या चित्रपटाच्या कलाकारांनी चित्रीकरणस्थळीच गणपतीच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना केली आहे.

सणासुदीच्या दिवशीही मराठी चित्रपटसृष्टी कार्यरत असते. अनेक कलाकार रात्र-दिवस काम करत असतात. देवाची भक्ती व पूजा-अर्चा करण्य़ासाठीही या
कलाकारांना बर्याचदा वेळ मिळत नाही. अनेक कलाकारांची ही व्यथा जाणून मंगलाष्टका वन्स मोअर च्या निर्मात्या व सुप्रसिद्ध अभिनेत्री रेणू देसाई या चित्रपटाच्या
शुटींग सेटवरच स्वप्नील जोशी,मुक्ता बर्वे, सई ताम्हणकर, कादंबरी कदम, हेमंत ढोमे, सिनेमॅटोग्राफर संजय जाधव, कार्यकारी निर्माते संजय दावरा, कलादिग्दर्शक महेश साळगावकर या कलाकार-तंत्रज्ञांसोबत गणपतीचा उत्सव साजरा करत आहेत.
त्यामुळे सेटवरचे वातावरण मंगलमय आणि भक्तीमय झाले आहे. ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया‘ या जयघोषामध्ये सर्व कलाकार गणेशोत्सव आणि शुटींगचा आनंद घेत आहेत.