प्रार्थना बेहेरे ‘लक्स झक्कास हिरोईन’ ची मानकरी..
पल्लवी पाटील उपविजेती..
कॅमेराचा लखलखणारा प्रकाशझोत, स्टुडिओमधील उत्कंठा ताणून धरणारा क्षण, स्पर्धक तरूणींनी रोखून धरलेला श्वास.. उपस्थित चित्रपटसृष्टीतील मान्यवरांच्या खिळलेल्या उत्सुक नजरा.. आणि बहुप्रतिक्षित ‘लक्स झक्कास हिरोईन’ चा किताब! गेले 5 आठवडे चुरशीची लढत देऊन एकमेकींवर मात करणार्या 10 स्पर्धक तरूणींमधून 7 तरूणींची खडतर वाटचाल याकरिता चालू होती. सामान्यांप्रमाणे सिनेवर्तुळाही मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पणाची लॉटरी मिळवून देणार्या 9 एक्स झक्कास वाहिनीवरील ‘लक्स झक्कास हिरोईन’ या आगळ्या वेगळ्या टॅलेंट हंटची चर्चा विशेषच गाजली. ग्लॅमर.. पॅशन.. ब्युटी.. बोल्डनेस.. हार्ड वर्क.. नशीब.. सार्याच बाबतीत यशस्वी बाजी मारत ‘लक्स झक्कास हिरोईन’ चा किताब पटकावला ‘प्रार्थना बेहेरे‘ हिनं तर पल्लवी पाटील उपविजेती ठरली आहे. वाहिनीने सिध्द केला असं म्हटलं तर नक्कीच वावगं ठरणार नाही.
‘लक्स झक्कास हिरोईन’ किताब आणि त्या अनुषंगाने चालून येणारी मितवा चित्रपटातली महत्त्वपूर्ण भूमिका मिळाल्याने प्रार्थना बेहेरेचा आनंद द्विगुणीत झाला आहे. ‘मिनाक्षी सागर प्रॉडक्शन’या हिंदीतील प्रतिष्ठीत निर्मिती संस्थेचा आणि स्वप्ना वाघमारे-जोशी दिग्दर्शित महत्त्वाकांक्षी चित्रपट ‘मितवा’ मध्ये स्वप्नील जोशी आणि सोनाली कुलकर्णा यांच्या भूमिका असून त्याचे शूटींग सध्या गोव्यात चालू झाले आहे. तसेच पल्लवी पाटील या उपविजेत्या तरूणीला दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांच्या आगामी क्लासमेट या चित्रपटात संधी देण्यात आली आहे.
तरूणाईच्या कलगुणांना वाव देणारी ‘लक्स झक्कास हिरोईन’ ही 9 एक्स झक्कास संगीत वाहिनीने आयोजिलेल्या या स्पर्धेला मिळालेला प्रतिसाद वाखाणण्याजोगा आहे. तरूणाईच्या कलागुणांसोबतच त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्याचा उद्देश खऱ्या अर्थाने या वाहिनीने सिध्द केला असं म्हटलं तर नक्कीच वावगं ठरणार नाही.
LUX jhakaas heroine is a well seted , setting program. shevti je prekshakana mahit hota tech jhala,
jar tilach heroine banvaich hota, tar mag ha tv show kashala kela, ashich ghetal asta tari challi asti. nai tari tila yacha agodar anek wela serial,marathi shows,anchoring kartana bagitlay. sagli faltu giri ahe.