हिंदी सिनेमाप्रमाने मराठी सिनेमाही आता अधिकाधिक ग्लॅमरस होऊ लागला आहे. याच पार्श्वभूमीवर विज्ञान सिद्धी फिल्म्स लि. निर्मिती संस्थेची पहिली निर्मिती असलेला ‘संघर्ष’ हा महत्त्वकांक्षी मराठी सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. आर. विराज दिग्दर्शित ‘संघर्ष’ हा विषय तितक्याच प्रभावीपमे मांडण्याचा प्रयत्न या सिनेमातून करण्यात आला आहे. अलीकडेच या सिनेमाचा फस्ट लूक मुंबईत लाँच करण्यात आला. यावेळी सिनेमातील कलाकार-तंत्रज्ञांसह सिनेसृष्टीतील अनेक मान्यवर आवर्जुन उपस्थित होते.
सगळं सुरळीत सुरु असताना एखाद्या वळणावर असं काही घडतं की, संघर्ष हा अटळ असतो. यातूनच मग राजकारण, शह-काटशह यांचा खेळ सुरु होतो. विराज राजे दिग्दर्शित ‘संघर्ष’ या आगामी सिनेमातही शह-काटशहांचा रोमहर्षक खेळ पाहता येणार आहे.
मल्टीस्टारर संघर्ष सिनेमात राजेश शृंगारपुरे, माधवी निमकर, अमिता खोपकर, नकुल घाणेकर, प्राजक्ता माळी, अरुण नलावडे, डॉ. विलास उजवणे, अंशुमन विचारे, सुशांत शेलार, अजय पुरकर, सुलभा आर्य, संगीता कापुरे, देवदत्त नागे, सुनील देव, या कलाकारांच्या भूमिका आहेत. सामान्यांच्या सिस्टीम विरुद्धचा लढा या सिनेमात रेखाटण्यात आला आहे. येत्या 7 फेब्रुवारीला हा सिनेमा सिनेरसिकांच्या भेटीला येणार आहे.