मराठी प्रेक्षक ज्या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत होता तो सिनेमा म्हणजे ‘फत्तेशिकस्त‘! ‘फर्जंद’ सिनेमाच्या यशानंतर दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांचा हा दुसरा इतिहासिक मराठी सिनेमा! ‘फर्जंद’ प्रमाणेच मराठी प्रेक्षकांनी ‘फत्तेशिकस्त’ ला सिनेमागृहात भरभरून प्रेम दिलं आहे. सिनेमा प्रदर्शित झालेल्या पहिल्या आठवड्यातच सिनेमाने ३.५ कोटींचा गल्ला जमा केला आहे!
शुक्रवारी सिनेमाने महाराष्ट्रभरातून ६५ लाखांची कमाई केली. तर आठवड्यातल्या पुढल्या दोन दिवशी ‘फत्तेशिकस्त’ ची बॉक्स ऑफिसवरली कामगिरी अजूनच चांगली होत गेली! शनिवारी १.१७ कोटी तर रविवारी १.६८ कोटी असे अभूतपूर्व आकडे ‘फत्तेशिकस्त'(Fatteshikast) चं यश दर्शावतात! या सिनेमाने पुन्हा एकदा मराठी प्रेक्षकांच्या मनात स्वराज्य कालीन सिनेमावरचं प्रेम जागं केलं आहे.
‘फत्तेशिकस्त’ सिनेमामध्ये लाल किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी शाईस्तखानाची छाटली गेलेली बोटं हा प्रसंग केंद्रस्थानी आहे. कशाप्रकारे महाराजांनी आपल्या सहकार्यांसोबत हि मोहीम गनिमी काव्याने पार पाडली याचं चित्रण सिनेमात केलं गेलं आहे. अभिनेता चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandlekar) याने महाराजांची भूमिका साकारली आहे तर अनेक प्रसिद्ध कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमधून सिनेमात दिसतात. दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी आपला पुढला स्वराज्य कालीन सिनेमा हि जाहीर केला आहे जो सुद्धा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
Tags
fatteshikast box office collection,