झी मराठी वाहिनीवरील मिसेस मुख्यमंत्री ही मालिका मराठी प्रेक्षकांची सध्याची सर्वात आवडती मालिका आहे. त्यातील सुमीचं पात्र हे प्रेक्षकांच्या अगदीच जवळचं झालं आहे. सुमीची व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री अमृता धोंगडे (Amruta Dhongade) ने आपल्या पदार्पणातच मराठी प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन केलं आहे आणि तिला प्रचंड प्रसिद्धी लाभली आहे. सुमी या व्यक्तिरेखेमुळे अमृता महाराष्ट्रातील घराघरात पोहोचली.
अमृता मालिकेत साधी गावातली मुलगी वाटत असलीतरी ती खऱ्या आयुष्यात मात्र खूप ग्लॅमरस आहे. नुकतंच अमृताने काळ्या रंगाच्या आऊटफिटमधील फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले. या फोटोंमध्ये ती खूप सुंदर दिसतेय. तिच्या या फोटोजवर चाहत्यांच्या प्रतिक्रियांचा अक्षरशः वर्षाव होतोय.
चाहते अमृताच्या या लूकवर घायाळ झाले आहेत. आणि आपलं प्रेम त्यांनी कमेंट करून व रीऍक्ट करून अमृता पर्यंत पोहोचवलं आहे! ‘मिसेस मुख्यमंत्री'(Mrs.Mukhyamantri) या मालिकेमुळे अमृताचा चाहता वर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. नुकतंच या मालिकेने १०० भागांचा यशस्वी टप्पा पार केला. आणि सोशल मिडिया या मध्यमामुळे प्रेक्षकांचा थेट नातं कलाकारांशी जुळत आहे!
Tags
amruta dhongade,




















