Yashwantrao Chavan, Bakhar Eka Vaadalaachi | Official Trailer

एस्सेल विज़न घेऊन येत आहे महाराष्ट्र शासन आणि यशवंतराव चव्हाण संस्थान कृत, आपल्या कणखर हाताने महाराष्ट्र घडवणाऱ्या जाणत्या नेत्याच्या आयुष्याचा नाट्यमय प्रवास – “यशवंतराव चव्हाण – बखर एका वादळाची”

आधुनिक, पुरोगामी महाराष्ट्राचा शिल्पकार. म.गांधी आणि प. नेहरूंच्या ध्येय-धोरणाचा एकनिष्ठ, खरा वारसदार. लोकशाही तत्वांचा खंदा पाठीराखा. कार्यक्षम लोकाभिमुख राज्य म्हणून महाराष्ट्राचा लौकिक भारतभर नेणाऱ्या आणि आपल्या कर्तृत्वानं जगाच्या पटावर भारताची राजनीती, राजकीय चातुर्य प्रस्थापित करणारा एक द्रष्टा जाणता नेता. अशा यशवंतराव चव्हाण यांच्या रोमहर्षक आयुष्याचा नाट्यमय प्रवास…