“Surya” Upcoming Marathi Film Muhurt

3858

डी.के.प्रोडक्शन प्रस्तुत  एस.पी. मोशन फिल्म निर्मित “सुर्या” मराठी चित्रपटाचा शुभ मुहर्थ नुकताच स्वप्न नगरी, सुर्वे फार्म हाउस पनवेल येथे मोठ्या थाटामाटात  प्रमुख कलाकार, तंत्रण्य आणि प्रमुख पाहुण्याच्या उपस्थितीत पार पडला.

सुर्या चित्रपटात  मुख्य भूमिकेत मकरंद अनासपुरे, गणेश यादव, हेमंत बिर्जे, प्रसाद ठाणगे, अपर्णा  जाधव, रुचिता जाधव, अखिलेंद्र मिश्रा, सोमनाथ तडवळकर, अएजाज खान, संदेश जाधव असे मुख्य- कलाकार असून चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद विजयकुमार कदम याचे आहे .कॅमेरामन मधु राव, दिग्दर्शक हुसेन हैद्राबादी, नृत्यदिक्दर्शक राजू खान, फाईट मास्तर कौशल मोजेस, संगीत दिग्दर्शक देव चव्हान, निर्मिती प्रमुख अमित महाजीरे, कला दिक्दर्शक वासू पाटील यांचे असून या फिल्मचे कलाकार, तंत्रण्य हिन्दी चित्रपट गाजवलेले आहेत.

हा चित्रपट मराठीतील मोठी फिल्म असून, या चित्रपटातील गाणी खुच धमाल करणारी आहेत. या चित्रपटाचे शुटींग जोरात सुरु झालाय.

या फिल्मचे निर्माते मंगेश ठाणगे असून,  प्रसाद ठाणगे या चित्रपटातून पदार्पण करतोय. चित्रपटाचे निर्माते हे दादा कोंडके प्रतिष्ठानचे  ट्रस्टी आहेत, त्यांनी आधी “सतभारा कसा बदलला”,  “चाबू पाळली सासरला” या चित्रपटांची निर्मिती केली आहे