First look of Marathi Movie AANDHALI KOSHIMBIR released

Sudha Productions’s First look of Marathi film Aandhali Koshimbir, produced by Sudha Productions and directed by Aditya Ingale, was unveiled recently in Micta Awards function held at Macau. The cast and crew of the film was present at the event.

बापू सदावर्ते आणि कुटुंबियांची ‘आंधळी कोशिंबीर’ रुपेरी पडदा गाजवणारच..

सुधा प्रॉडक्शन निर्मित आणि आदित्य इंगळे दिग्दर्शित ‘आंधळी कोशिंबीर’ या चित्रपटाचा फर्स्ट लूक नुकताच रिलीज झाला आहे.याची पहिली झलक मकाऊ येथे झालेल्या मिक्ता पुरस्कार वितरण समारंभात चित्रपटाच्या टीमच्या उपस्थितीत दाखवण्यात आली. या लूकला उपस्थितांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. एव्हढंच नाही तर मिक्ता पुरस्कार वितरण सोहळ्यादरम्यान ‘आंधळी कोशिंबीर’च्या प्रोमोचीच चर्चा चालू होती. चित्रपटाच्या फर्स्ट लूकलाच एवढा प्रतिसाद मिळाला आहे की अशोक सराफ, वंदना गुप्ते, आनंद इंगळे, अनिकेत विश्वासराव, प्रिया बापट, मृण्मयी देशपांडे, ऋषीकेश जोशी, हेमंत ढोमे कलाकारांची ‘आंधळी कोशिंबीर’ रुपेरी पडदा गाजवणार हे नक्की…