‘Ajoba’ Wildlife Photography Contest

आज मराठी सिनेमांच्या मार्केटींगबद्दल अनेक नवनवीन प्रयोग करण्यात येत असल्याची उदाहरणे आपल्याला इंडस्ट्रीत बघायला मिळतात. त्यातीलच एक म्हणजे सुजय डहाके दिग्दर्शित आणि “सुप्रीम मोशन पिक्चर्स”ची निर्मिती असलेला ‘आजोबा’. प्रेक्षक या सिनेमाची अतिशय आतुरतेने वाट बघत असून लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. दरम्यान, हा सिनेमा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावा यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून प्रमोशन करण्यात येत आहे. नुकतीच वाईल्ड लाईफ फोटोग्राफी संदर्भातील एक कॉन्टेस्ट ‘आजोबा’ टीमकडून सुरू करण्यात आली आहे. ज्याचं एक प्रदर्शन सुद्धा भरवण्यात येणार आहे. या कॉन्टेस्टसाठी वाईल्ड लाईफ फोटोग्राफ्स पाठवण्याचे आवाहन ‘आजोबा’ टीमकडून करण्यात आली आहे.

Hows To Participate?
Hows To Participate?

“आजोबा’ चित्रपटात हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर, अभिनेता यशपाल शर्मा यांच्याबरोबरच दिलीप प्रभावळकर, हृषीकेश  जोशी, नेहा महाजन, सुहास शिरसाट, शशांक शेंडे, श्रीकांत यादव, ओम भुतकर, अनिता दाते आणि चिन्मय कुलकर्णी आदी कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

‘आजोबा’ वाईल्ड लाईफ फोटोग्राफ’ या कॉन्टेस्टमध्ये भाग घेण्यासाठी नियम – 

  • स्पर्धक एकावेळी फक्त २ फोटो पाठवू शकतात.
  • जे फोटो स्पर्धक पाठवतील ते ओरीजीनल आणि त्यांचेच असावेत.
  • स्पर्धकांनी फोटोबरोबर त्यांचे नाव, संपर्काचा पत्ता आणि शहराचे नाव पाठवावे.
  • प्रत्येक फोटोला कॅप्शन असणे आवश्यक आहे.

या कॉन्टेस्टमध्ये आलेल्या सर्व फोटोंमधून उत्तम कलाकृतींची निवड करून त्याची एक प्रदर्शनी भरविण्यात येणार आणि विजेत्या स्पर्धकाला ‘आजोबा’ टीमकडून वाईल्ड लाईफ सफारी ट्रीप करण्याची संधी मिळणार आहे. स्पर्धकांनी हे फोटोज [email protected] या ई-मेलवर पाठवायचे आहेत. या कॉन्टेस्टसाठीचे फोटो १ मार्च २०१४ पर्यंत पाठवायचे आहेत.

अधिक माहितीसाठी तुम्ही खाली दिलेल्या लिंक्सवर भेट देऊ शकता.

Official Website : www.ajobathemovie.com
Official FB Page : www.facebook.com/Ajoba.tv