‘Vanshvel’ And ‘Premacha Jhol Jhaal’ : World TV Premiere on Zee Talkies

1156

प्रेक्षकांची अभिरुची जपणा-या ‘झी टॉकीज’ने नेहमीच आपल्या वाहिनीद्वारे दर्जेदार चित्रपटांचे आणि कार्यक्रमांचे प्रक्षेपण केले आहे. विविधरंगी विषयांवरील ‘झी टॉकीज’च्या सिनेमांनी नेहमीच प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. यावेळी देखील ‘झी टॉकीज’ने रसिकांसाठी ‘खो खो’, ‘प्रेमाचा झोलझाल’, ‘वंशवेल’ चित्रपटांची भन्नाट मेजवानी आणली आहे. पहिल्यांदाच या सिनेमांचे वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियर ‘झी टॉकीज’या लोकप्रिय वाहिनीवर होत असून यातील ‘खो खो’ सिनेमाचा आस्वाद आपण 9 मार्चला घेतला. त्याप्रमाणेच येत्या 16 मार्चला ‘प्रेमाचा झोलझाल’ तर, 23 मार्चला ‘वंशवेल‘ चित्रपट दुपारी 12.00 वा. आणि सायं 6.00 वा. असे दोन वेळा प्रक्षेपित होणार आहेत.

रविवारी 16 व 23 मार्चला दुपारी 12.00 वा. आणि सायं 6.00 वा. ‘प्रेमाचा झोलझाल’ व ‘वंशवेल’ पहायला विसर नका आपल्या आवडत्या झी टॉकीज वाहिनीवर..