रंजक कथानक आणि नव्या दमाचे आश्वासक कलाकार असलेल्या संगीतमय तत्ताड या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. नावापासूनच वेगळेपण जपलेल्या या चित्रपटाचं कुतूहल या ट्रेलरमुळे नक्कीच वाढलं आहे.
वेब स्ट्रीमिंगमध्ये आघाडीवर असलेल्या प्राइमफ्लिक्सनं हा चित्रपट प्रस्तुत केला आहे. चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन राहुल गौतम ओव्हाळ यांनी केलं आहे. राकेश भोसले, सुशील देशपांडे आणि प्रितम म्हेत्रे चित्रपटाचे निर्माते आहेत. लग्नातल्या बँडमध्ये पिपाणी वाजवणाऱ्या एका तरुणाची प्रेमकथा या चित्रपटातून मांडण्यात आली आहे. त्यामुळेच या कथेला संगीताचा एक विलक्षण पदर आहे. हा चित्रपट २१ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. 

चित्रपटात चेतन डीके, मानसी पाठक, ज्योती सुभाष, अनिल नगरकर, राहुल बेलापूरकर, सागर पवार, प्रफुल्लकुमार कांबळे, अक्षदा काटकर, गिरीजा झाड,
सुदर्शन काळे, रोहित जाधव, राजेश मोरे, शरद ढिकुले, स्वप्नील धोंगडे, प्रसाद ओझरकर, काका शिरोळे अशी उत्तम स्टारकास्ट या चित्रपटात आहे. ट्रेलरवरून हा चित्रपट तांत्रिकदृष्ट्या सक्षम, भावनिक कथा मांडणारा आणि उत्तम संगीताचा आनंद देणार असल्याचं दिसून येत आहे. मात्र आता प्रेक्षकांना २१ फेब्रुवारीपर्यंत वाट पहावी लागणार आहे.
Tags
new marathi videosongs, Marathi movie songs videos, Marathi movie songs,