Zee 5 Marathi Webseries Archives - MarathiStars https://marathistars.com/tag/zee-5-marathi-webseries/ Marathi Actress Wallpapers,Photos,Images,tv Serial Actress,Photos, Fri, 21 Aug 2020 10:29:27 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.6.2 तान्हाजी फेम शरद केळकर निर्मित, संदीप पाठक अभिनित ‘ईडक’ झी५ वर प्रदर्शित https://marathistars.com/news/sandeep-pathaks-idak-marathi-movie-zee5/ https://marathistars.com/news/sandeep-pathaks-idak-marathi-movie-zee5/#respond Fri, 21 Aug 2020 10:28:29 +0000 https://marathistars.com/?p=35399 मराठी सिनेसृष्टीत अभिनेत्यांची ओळख ही केवळ त्यांच्या लूक्स पुरती मर्यादित न राहता त्यांच्या अभिनय कौशल्याद्वारे ते अधिक स्मरणात राहतात. मराठी सिनेसृष्टीतील असाच एक अभिनेता म्हणजे संदीप पाठक. संदीप हा मूळचा बीड जिल्ह्यातील माजलगावचा रहिवासी. मात्र अभिनयाच्या आवडीपोटी त्याने पुण्यातील ललित कला केंद्रातून नाट्य शास्त्राची पदवी संपादन केली. त्यानंतर खऱ्या अर्थाने सुरू झाला संदीपचा अभिनय क्षेत्रातील […]

The post तान्हाजी फेम शरद केळकर निर्मित, संदीप पाठक अभिनित ‘ईडक’ झी५ वर प्रदर्शित appeared first on MarathiStars.

]]>
AmpedSense.OptimizeAdSpot('AP'); AmpedSense.OptimizeAdSpot('IL'); AmpedSense.OptimizeAdSpot('IR');

मराठी सिनेसृष्टीत अभिनेत्यांची ओळख ही केवळ त्यांच्या लूक्स पुरती मर्यादित न राहता त्यांच्या अभिनय कौशल्याद्वारे ते अधिक स्मरणात राहतात. मराठी सिनेसृष्टीतील असाच एक अभिनेता म्हणजे संदीप पाठक. संदीप हा मूळचा बीड जिल्ह्यातील माजलगावचा रहिवासी. मात्र अभिनयाच्या आवडीपोटी त्याने पुण्यातील ललित कला केंद्रातून नाट्य शास्त्राची पदवी संपादन केली. त्यानंतर खऱ्या अर्थाने सुरू झाला संदीपचा अभिनय क्षेत्रातील प्रवास. अनेक प्रायोगिक नाटकांमध्ये काम केल्यानंतर संदीपला व्यावसायिक रंगभूमीवर पहिली  संधी मिळाली ती म्हणजे पुरुषोत्तम बेर्डे दिग्दर्शित ‘सर आली धावून’ या नाटकात. या नाटकात त्याने दस्तुरखुद्द लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत काम केले. या नाटकात संदीपने साकारलेल्या मुरलीधर कोयंडे ह्या भूकंप पीडिताच्या भूमिकेला प्रेक्षकांंसोबतच लक्ष्मीकांत बेर्डेे यांंची देखील कौतुकाची थाप मिळाली.

२००१ साली संदीपने मुंबईत पाऊल ठेवले आणि विविध मराठी चित्रपट, मालिका आणि नाटकाद्वारे तो प्रेक्षकांच्या भेटीला आला. श्वास, हरिश्चंद्राची फॅक्टरी, नटसम्राट, एक हजाराची नोट यांसारखे दर्जेदार चित्रपट, जादू तेरी नजर, व्यक्ती आणि वल्ली, सखाराम बाईंडर, वऱ्हाड निघालंय लंडनला यांसारखी प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करणारी नाटकं, हसा चकटफू, असंभव, रुद्रम यांसारख्या लोकप्रिय मालिका ह्या कलाकृतींनी संदीपची कारकीर्द समृध्द केली. केवळ विनोदीच नव्हे तर गंभीर धाटणीच्या भूमिकाही त्याने चपखलपणे रंगवल्या आहेत.

ह्या प्रवासात त्याला कधी प्रसिद्धी मिळाली तर कधी निराशेला सामोरं जावं लागलं. परंतु मिळालेल्या प्रसिद्धीची हवा त्याने कधी डोक्यात जाऊन दिली नाही की कधी निराशेच्या गर्तेत अडकून त्याने माघार घेतली नाही. वाट्याला आलेल्या छोट्या छोट्या भुमिकाही त्याने आनंदाने स्विकारल्या. आता तब्बल २० वर्षांनतर संदीप पहिल्यांदा ‘ईडक’ ह्या चित्रपटाद्वारे नायक म्हणून आपल्यासमोर येणार आहे . शरद केळकर निर्मित आणि दीपक गावडे दिग्दर्शित हा चित्रपट झी फाईव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर आज प्रदर्शित होत आहे.

संदीपची ही वीस वर्षांची कारकीर्द नक्कीच नवीन कलावंतांसाठी प्रेरणादायी ठरेल.त्याची ही अभिनय क्षेत्रातील वाटचाल उत्तरोत्तर अशीच बहरत जाओ याच सदिच्छा.

The post तान्हाजी फेम शरद केळकर निर्मित, संदीप पाठक अभिनित ‘ईडक’ झी५ वर प्रदर्शित appeared first on MarathiStars.

]]>
https://marathistars.com/news/sandeep-pathaks-idak-marathi-movie-zee5/feed/ 0 35399
लॉकडाऊन मध्ये आवर्जून पहा या मराठी वेबसिरीज.. https://marathistars.com/news/top-5-marathi-webseries-2020/ https://marathistars.com/news/top-5-marathi-webseries-2020/#respond Wed, 29 Apr 2020 12:42:25 +0000 https://marathistars.com/?p=35280 गेल्या काही दिवसांपासून आपण सतत नेटफ्लिक्स, Zee5, Amozon Prime किंवा MX Player यांच्या विषयी ऐकलं असेल किंवा तुमच्या मोबाईल मध्ये या पैकी App ही असतील.. सिम्पल फंडा है बॉस, जो भी हम थेटर मे जाके देखते है, वैसाही कंटेंट हमको इधर भी मिलता है । फक्त थोडे पैसे खर्च करायचे आणि Membarship घ्यायची.. झालं, मनोरंजनाच […]

The post लॉकडाऊन मध्ये आवर्जून पहा या मराठी वेबसिरीज.. appeared first on MarathiStars.

]]>
AmpedSense.OptimizeAdSpot('AP'); AmpedSense.OptimizeAdSpot('IL'); AmpedSense.OptimizeAdSpot('IR');

गेल्या काही दिवसांपासून आपण सतत नेटफ्लिक्स, Zee5, Amozon Prime किंवा MX Player यांच्या विषयी ऐकलं असेल किंवा तुमच्या मोबाईल मध्ये या पैकी App ही असतील.. सिम्पल फंडा है बॉस, जो भी हम थेटर मे जाके देखते है, वैसाही कंटेंट हमको इधर भी मिलता है । फक्त थोडे पैसे खर्च करायचे आणि Membarship घ्यायची.. झालं, मनोरंजनाच दुकान तुमच्या घरी नाही, तर मोबाईल मध्ये सुरू.. ते ही दर्जेदार Web Series.. जे तुम्हाला थिएटर मध्ये अनुभवायला मिळतं किंवा त्याहून जास्त मसाला, ड्रामा, ऍक्शन, रोमान्स आणि महत्वाचं म्हणजे फुल ऑन मनोरंजन..
अर्थात या सगळ्यात मराठी माणूस कसा मागे राहील.. या सगळ्यांच वारं मराठी चित्रपट सृष्टीतही शिरलं आणि दर्जेदार मराठी वेब सिरिज प्रेक्षकांच्या भेटीला आल्या..जाणून घेऊया काही मोजक्या पण तुम्ही नक्की बघायला पाहिजे अशा मराठी वेब सिरीज-

१. समांतर

Samantar MX Player Marathi Web Series Season 1 Episodes Watch Online Swwapnil Joshi Tejashwini Pandit
सुहास शिरवळकर यांच्या कादंबरी वर आधारित समांतर ही वेब सिरीज प्रेक्षकांच्या चांगलीच पसंत पडली आहे.. स्वप्नील जोशी आणि तेजस्वीनी पंडित यांची मुख्य भूमिका असलेली ही सिरीज म्हणजे घडून गेलेल्या भविष्यकाळाचा मागोवा आहे.. तांत्रिक बाजू ही उत्तम असल्याने ही वेब सिरीज पाहायला काहीच हरकत नाही

२. एक थी बेगम-

Ek Thi Begum 2020 MX Player Web Series Episdoes Season Watch Online Anuja Sathe
८० च्या दशकातील मुंबईतील गॅंगवॉर आणि ड्रग्स माफिया यांच्या भोवती सत्य घटनेवर आधारित वेब सिरीज म्हणजे एक थी बेगम..
क्राईम सस्पेन्स थ्रिलर या सदरात मोडणारी ही सिरीज मुळे मुंबई ते दुबई पर्यंत सगळ्यांचे धाबे दणाणून सोडणाऱ्या एका स्त्री ची गोष्ट आहे, जिचा नवऱ्याला नाहक मारलं जातं आणि ती सगळ्यांचा सूड घेते..

३.काळे धंदे-

Kaale Dhande Zee 5 Marathi Web Series All Episodes Season Watch Online Mahesh Manjrekar
हसून हसून पोट दुखायला लावणारी कॉमेडी म्हणजे Zee5 वरील काळे धंदे..ही विकी या तरूण छायाचित्रकारची गोष्ट आहे.. वेगवेगळ्या अप्रत्याशित परिस्थितीमुळे त्याचे जीवन कसे बदलते याबद्दल ही कहाणी फिरत आहे. गोष्टी व्यवस्थित लावण्याच्या बेताने तो आणखी गडबडीत अडकतो. निव्वळ करमणूक म्हणून
महेश मांजरेकर, संस्कृति बालगुडे आणि शुभंकर तावडे मुख्य भूमिका असलेला ही वेब सिरीज बघायला हरकत नाही..

४. पांडू

Pandu 2020 Mx Player Marathi Web Series All Episodes Season Watch Onlineकदाचित ही सिराज पाहून तरी मुंबई पोलिसांच्या परिस्थिती आपल्याला कल्पना येईल.. निदान ह्या लॉकडाऊन मध्ये तरी.. मुंबई शहरातील एका पोलिसांच्या रोजच्या जीवनात आपल्याला घेऊन जाईल. हा नर्म विनोद आहे..पोलीस हा पण एक माणूसच असतो, पोलिसांच्या मानवी बाजूचा शोध म्हणजे पांडू.. पांडु भ्रष्ट नाही, किंवा तो एक माचो नायकही नाही, त्याला शक्य तितक्या चांगल्या मार्गाने आपल्या मुलाचे संगोपन करायचे आहे.

५. ..आणि काय हवं

Aani Kay Hava MX Player Marathi Web Serier

प्रिया बापट आणि उमेश कामत या जोडगोळीची ‘..आणि काय हवं’ म्हणजे एक गोड गुलाबी कथा आहे जी तुम्हाला प्रेमात पाडते, पुन्हा पुन्हा प्रेम करायला लावते आणि ओठांवर हसू खुलवते.. पुण्यात राहणाऱ्या विवाहित मध्यमवर्गीय जोडप्याच्या जीवनातील प्रेमकथेचे गोड गुलाबी क्षण या सिरीज मधून आपल्याला पहायला मिळतात. नवरा बायको म्हणून असणारी भावनिक गुंतागुंत,एकमेकांना समजून घेणं हे या सगळ्या वर भाष्य करणारी ही सिरीज एकदा नक्की बघायला हवी..

तर या आहेत मराठीतील काही निवडक वेब सिरीज ज्यांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलंय.. तुम्ही पण पहिल्या असालचं आणि नसेल पाहिलं तर एकदा नक्कीच बघा.. कदाचित तुम्ही पण वेब सिरीज चे फॅन होऊन जाल..

The post लॉकडाऊन मध्ये आवर्जून पहा या मराठी वेबसिरीज.. appeared first on MarathiStars.

]]>
https://marathistars.com/news/top-5-marathi-webseries-2020/feed/ 0 35280
Hutatma Teaser Zee5 : The Story Behind ‘Sanyukta Maharashtra Chalval’! https://marathistars.com/videos/hutatma-teaser-zee5-the-story-behind-sanyukta-maharashtra-chalval/ https://marathistars.com/videos/hutatma-teaser-zee5-the-story-behind-sanyukta-maharashtra-chalval/#respond Mon, 22 Apr 2019 06:15:16 +0000 https://marathistars.com/?p=32996 Upcoming Zee5 original series ‘Hutatma’ starring Anjali Patil, Vaibhav Tatwawadi, Sachin Khedekar is finally exploring that chapter in the history of Maharashtra where many activists & those fighting for a united Maharashtra lost their lives. Even after so many years we have hardly seen any of it in our pop culture, whether it’s theatre, films, […]

The post Hutatma Teaser Zee5 : The Story Behind ‘Sanyukta Maharashtra Chalval’! appeared first on MarathiStars.

]]>
AmpedSense.OptimizeAdSpot('AP'); AmpedSense.OptimizeAdSpot('IL'); AmpedSense.OptimizeAdSpot('IR');

Upcoming Zee5 original series ‘Hutatma’ starring Anjali Patil, Vaibhav Tatwawadi, Sachin Khedekar is finally exploring that chapter in the history of Maharashtra where many activists & those fighting for a united Maharashtra lost their lives. Even after so many years we have hardly seen any of it in our pop culture, whether it’s theatre, films, T.V. or the web platform! But now on Zee5’s web platform this history will finally get explored.

The series will be available in both Marathi & Hindi for the audiences on Zee5. The teaser of the series was recently uploaded on the platform & it truly looks very powerful & realistic. Anjali Patil especially steals the show in the last shot of the teaser. This series is directed by Jayprad Desai who has a history of creating fiction related to politics. He previously made the political thriller ‘Nagrik’ starring Sachin Khedekar.

The series also stars Abhay Mahajan, Anand Ingle and many other Marathi actors. Web platforms are truly diminishing the boundaries of language, culture & even subjects. Subjects that cannot be shown on Television can be explored through this platform with complete creative freedom for the creators!

The post Hutatma Teaser Zee5 : The Story Behind ‘Sanyukta Maharashtra Chalval’! appeared first on MarathiStars.

]]>
https://marathistars.com/videos/hutatma-teaser-zee5-the-story-behind-sanyukta-maharashtra-chalval/feed/ 0 32996