Vanshvel Marathi Movie Archives - MarathiStars https://marathistars.com/tag/vanshvel-marathi-movie/ Marathi Actress Wallpapers,Photos,Images,tv Serial Actress,Photos, Thu, 03 Oct 2013 13:39:43 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.2.2 40256045 No change in Rajeev Patil’s Vanshvel release date https://marathistars.com/news/no-change-in-release-date-for-rajeev-patils-vanshvel/ https://marathistars.com/news/no-change-in-release-date-for-rajeev-patils-vanshvel/#respond Thu, 03 Oct 2013 13:39:43 +0000 https://marathistars.com/?p=6191 ‘सावरखेड एक गाव’,‘ब्लाइंड गेम’,‘सनई चौघडे’सारखे वेगळ्या विषयांवरचे चित्रपट असो वा कादंबरीवर आधारित ‘पांगिरा’,‘जोगवा’,‘72 मैल एक प्रवास’ सारखे सामाजिक विषयांवर स्पर्श करणारे चित्रपट दिग्दर्शक राजीव पाटील यांनी आपल्या प्रत्येक कलाकृतींतून चांगला आशय मांडण्याचा नेहमीच प्रयत्न केला. त्यांच्या अकस्मात निधनाने संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. राजीव पाटील आपल्या आगामी ‘वंशवेल’ या चित्रपटासाठी खूप उत्सुक होते. हा […]

The post No change in Rajeev Patil’s Vanshvel release date appeared first on MarathiStars.

]]>
AmpedSense.OptimizeAdSpot('AP'); AmpedSense.OptimizeAdSpot('IL'); AmpedSense.OptimizeAdSpot('IR');

‘सावरखेड एक गाव’,‘ब्लाइंड गेम’,‘सनई चौघडे’सारखे वेगळ्या विषयांवरचे चित्रपट असो वा कादंबरीवर आधारित ‘पांगिरा’,‘जोगवा’,‘72 मैल एक प्रवास’ सारखे सामाजिक विषयांवर स्पर्श करणारे चित्रपट दिग्दर्शक राजीव पाटील यांनी आपल्या प्रत्येक कलाकृतींतून चांगला आशय मांडण्याचा नेहमीच प्रयत्न केला. त्यांच्या अकस्मात निधनाने संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. राजीव पाटील आपल्या आगामी ‘वंशवेल’ या चित्रपटासाठी खूप उत्सुक होते. हा चित्रपट घरोघरी पोहोचावा अशी त्यांची इच्छा होती. पंरतु त्यांच्या या अकाली निधनाने वंशवेल चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबतीत त्यांच्या चाहत्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला होता. परंतु राजीव पाटील यांचे स्वप्न असलेला ‘वंशवेल’ ठरविलेल्या तारखेदिवशीच म्हणजेच 18 ऑक्टोबरला प्रदर्शित करण्यात येत असल्याचे चित्रपटाचे निर्माते सुनील मानकर यांनी सांगितले.

यासंदर्भात सुनिल मानकर यांनी राजीव पाटील यांच्या कुटुंबियांशी चर्चा केली असता, त्या सगळ्यांनीच ‘वंशवेल’ हा केवळ चित्रपटच नाही, तर ते राजीव यांचे स्वप्न होते अशी प्रतिक्रिया दिली. राजीव पाटील जरी आपल्यात नसले तरी त्यांनी पाहिलेले स्वप्न पूर्णत्वाकडे नेणे हे आपले कर्तव्य आहे अशीच त्यामागची भावना होती.

Vanshvel Marathi Movie Still Photo
Vanshvel Marathi Movie Still Photo

चित्रपटातील सर्व कलाकार या दु:खातून सावरत राजीव पाटील यांच्या या स्वप्नपूर्तासाठी पूर्वीच्याच जोमाने प्रयत्न करणार असल्याची माहितीही निर्माते सुनील मानकर यांनी दिली. हा चित्रपट ठरल्या तारखेला प्रदर्शित करण्यासोबतच तो यशस्वी करणे हीच ख-या अर्थाने राजीव पाटील यांना श्रध्दांजली ठरेल अशी भावना ही यातील कलाकारांनी आणि चित्रपटाच्या टीमने व्यक्त केली.

‘अर्चित फिल्मस्’ बॅनरच्या ‘वंशवेल’ या चित्रपटात अंकुश चौधरी, किशोर कदम, सुशांत शेलार, शंतनू गंगावणे, मनिषा केळकर, नम्रता गायकवाड, विद्या करंजीकर, उषा नाईक या कलाकारांच्या दमदार भूमिका आहेत. दामोदर मानकर यांची कथा असलेल्या‘वंशवेल’या चित्रपटाचा कथाविस्तार आणि पटकथा ही राजीव पाटील आणि दत्ता पाटील यांची आहे. वंशवेल हा चित्रपट स्त्री-पुरूष समानता हा विचार केवळ आदर्शापुरता मार्यादित न ठेवता त्याची अंमलबजावणी माणूसपणाच्या विचारातून करायला हवी हा उद्देश देणारा आणि एकत्रित कुटुंब पध्दतीवर सकारात्मकपणे भाष्य करणारा आहे.

The post No change in Rajeev Patil’s Vanshvel release date appeared first on MarathiStars.

]]>
https://marathistars.com/news/no-change-in-release-date-for-rajeev-patils-vanshvel/feed/ 0 6191
Vanshvel Marathi Movie https://marathistars.com/movies/vanshvel-marathi-movie/ https://marathistars.com/movies/vanshvel-marathi-movie/#respond Tue, 24 Sep 2013 12:57:39 +0000 https://marathistars.com/?p=6047 ‘VANSHVEL’ A FILM BY RAJEEV PATIL RELEASING ON 18th OCTOBER 2013 Movie : Vanshvel Produced By : Sunil Mankar Directed By : Rajeev Patil Star Cast : Ankush Chaudhary, Kishore kadam, Namrata Gaikwad and Sushant Shelar, Shantanu Gangane, Manisha Kelkar, Vidya Karanjikar, Usha Naik. Story: Damodar Narayan Mankar Dialogues : Datta Patil Music : Amit Raj Genre : Drama […]

The post Vanshvel Marathi Movie appeared first on MarathiStars.

]]>
AmpedSense.OptimizeAdSpot('AP'); AmpedSense.OptimizeAdSpot('IL'); AmpedSense.OptimizeAdSpot('IR');

‘VANSHVEL’ A FILM BY RAJEEV PATIL RELEASING ON 18th OCTOBER 2013

  • Movie : Vanshvel
  • Produced By : Sunil Mankar
  • Directed By : Rajeev Patil
  • Star Cast : Ankush Chaudhary, Kishore kadam, Namrata Gaikwad and Sushant Shelar, Shantanu Gangane, Manisha Kelkar, Vidya Karanjikar, Usha Naik.
  • Story: Damodar Narayan Mankar
  • Dialogues : Datta Patil
  • Music : Amit Raj
  • Genre : Drama
  • Release Date : 18th OCTOBER 2013

Vanshvel Marathi Movie Posters / Still Photos :



Vanshvel Marathi Movie Theatrical Trailer/Promo


The post Vanshvel Marathi Movie appeared first on MarathiStars.

]]>
https://marathistars.com/movies/vanshvel-marathi-movie/feed/ 0 6047
18 Marathi Actress to perform Dandiya for Vanshvel Marathi Movie https://marathistars.com/news/18-marathi-actress-perform-dandiya-vanshvel-marathi-movie/ https://marathistars.com/news/18-marathi-actress-perform-dandiya-vanshvel-marathi-movie/#respond Mon, 23 Sep 2013 19:41:49 +0000 https://marathistars.com/?p=6034 18 Marathi Actress to perform Dandiya for promotional Song of Vanshvel Marathi Movie.This is the first time that 18 leading marathi actress will be seen in marathi song. स्त्री शक्तीचा जागर. ‘वंशवेल’ मधील प्रमोशनल गीतासाठी मराठीतील आघाडीच्या १८ अभिनेत्री पहिल्यांदाच एकत्र.. समाजात स्त्रियांवर होणाNया अत्याचारांविषयीच्या चर्चा झडताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर स्त्री शक्तीला वंदन करत देवी […]

The post 18 Marathi Actress to perform Dandiya for Vanshvel Marathi Movie appeared first on MarathiStars.

]]>
AmpedSense.OptimizeAdSpot('AP'); AmpedSense.OptimizeAdSpot('IL'); AmpedSense.OptimizeAdSpot('IR');

18 Marathi Actress to perform Dandiya for promotional Song of Vanshvel Marathi Movie.This is the first time that 18 leading marathi actress will be seen in marathi song.

स्त्री शक्तीचा जागर.

‘वंशवेल’ मधील प्रमोशनल गीतासाठी मराठीतील आघाडीच्या १८ अभिनेत्री पहिल्यांदाच एकत्र..

समाजात स्त्रियांवर होणाNया अत्याचारांविषयीच्या चर्चा झडताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर स्त्री शक्तीला वंदन करत देवी अंबेमातेचा जागर करण्यासाठी 18 मराठी तारका एकत्र आल्या होत्या, निमित्त होते राजीव पाटील दिग्दर्शित ‘वंशवेल’ या आगामी सिनेमाच्या प्रमोशनल गीताचे. मराठी सिनेसृष्टीतील 18 अभिनेत्रींनी पहिल्यांदाच एकत्र येऊन देवीला साकडं घालत स्त्रीशक्तीचा प्रत्यय दिला. अर्चित फिल्मस प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती सुनील दामोदर मानकर यांची आहे.

18 marathi Actress vanshvel marathi movie
18 marathi Actress vanshvel marathi movie

चांदिवलीच्या स्टुडिओमध्ये ‘वंशवेल’ मधील या गाण्याचं चित्रीकरण नुकतच संपन्न झालं. यामध्ये स्मिता तांबे, अमृता खानविलकर, दिपाली सय्यद, क्रांती रेडकर ,मेघा घाडगे, नेहा पेंडसे, स्मिता शेवाळे, पूजा सावंत, सई लोकूर, तेजा देवकर, समीधा गुर, सिया पाटील, पूर्वा पवार, सोनाली खरे आणि ‘वंशवेल’ चित्रपटातल्या अभिनेत्री मनिषा केळकर, नम्रता गायकवाड, विदया करंजीकर व बालकलाकार जान्हवी मानकर या सगळ्यांनी एकत्र येत देवाचा जागर केला. गीतकार दत्ता पाटील यांनी लिहिलेल्या

‘तूच दूर्गा तूच भवानी, संसाराची तू जननी..
सारी माया तूझी, अंबे कृपा करी..’

या गीताला संगीतकार अमितराज यांनी संगीत दिले असून आदर्श शिंदे यांनी हे गीत गायले आहे. नृत्यदिग्दर्शक विठ्ठल पाटील यांच्या नृत्यदिग्दर्शनाखाली या 18 अभिनेत्रींवर हे गीत चित्रीत करण्यात आले आहे. व कॅमेरामन विजय मिश्रा यांनी गीताचे छायाचित्रण केले.

या गाण्याची संकल्पना स्त्रियांना सन्मान देण्याविषयी आहे. नवरात्रीतच नव्हे तर इतर वेळीही स्त्रियांचा योग्य त-हेने मान सन्मान व्हावा हा मूळ हेतू हे गीता मागचा आहे. या सगळ्या अभिनेत्री देखील स्वत:चे अस्तित्व शोधण्यासाठी इथवर आल्या आहेत. या गाण्यातून त्यांचा देखील सन्मान करण्यात आला आहे.

18 marathi Actress  vanshvel marathi movie
18 marathi Actress vanshvel marathi movie

सध्याची कुटुंबव्यवस्था आणि त्यातील ‘स्त्रि’चं महत्त्व यावर भाष्य करणारी ‘वंशवेल’ चित्रपटाची कथा संकल्पना दामोदर नारायण मानकर यांची असून कथा विस्तार आणि पटकथा राजीव पाटील आणि दत्ता पाटील यांनी लिहिली आहे. अंकुश चौधरी, किशोर कदम, सुशांत शेलार, शंतनू गंगावणे, मनिषा केळकर, नम्रता गायकवाड, विदया करंजीकर, उषा नाईक या कलाकारांच्या भूमिका असलेला ‘वंशवेल’ हा चित्रपट येत्या 18 ऑक्टोबरला प्रदर्शित होतोय.

The post 18 Marathi Actress to perform Dandiya for Vanshvel Marathi Movie appeared first on MarathiStars.

]]>
https://marathistars.com/news/18-marathi-actress-perform-dandiya-vanshvel-marathi-movie/feed/ 0 6034