Bhakar Marathi Movie Archives - MarathiStars https://marathistars.com/tag/bhakar-marathi-movie/ Marathi Actress Wallpapers,Photos,Images,tv Serial Actress,Photos, Tue, 10 Jun 2014 08:52:48 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.6.2 Bhakar to release on 23rd May 2014 https://marathistars.com/news/bhakar-release-23rd-may-2014/ https://marathistars.com/news/bhakar-release-23rd-may-2014/#respond Tue, 20 May 2014 09:56:59 +0000 https://marathistars.com/?p=9168 शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा वेध घेणारा चित्रपट ‘भाकर’ २३ मे ला प्रदर्शित शेतकरी.. आपला अन्नदाता.. उत्पन्न आणि खर्च यांचा मेळ साधत गेली वर्षानुवर्षे संसाराचा गाडा रेटणारा बळीराज कायमच आर्थिक विवंचनेत अडकलेला राहिला. सावकाराचे कर्ज, वादळ-गरपीटासारखी आस्मानी संकट झेलत राबणाऱ्या शेतकऱ्याच्या पदरी नेहमीच उपेक्षा आली. उपजीविकेचे एकमेव साधन असलेली शेती आणि त्यातूनच आलेल्या कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्या करण्यास धजावतो, […]

The post Bhakar to release on 23rd May 2014 appeared first on MarathiStars.

]]>
AmpedSense.OptimizeAdSpot('AP'); AmpedSense.OptimizeAdSpot('IL'); AmpedSense.OptimizeAdSpot('IR');

शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा वेध घेणारा चित्रपट ‘भाकर’ २३ मे ला प्रदर्शित

शेतकरी.. आपला अन्नदाता.. उत्पन्न आणि खर्च यांचा मेळ साधत गेली वर्षानुवर्षे संसाराचा गाडा रेटणारा बळीराज कायमच आर्थिक विवंचनेत अडकलेला राहिला. सावकाराचे कर्ज, वादळ-गरपीटासारखी आस्मानी संकट झेलत राबणाऱ्या शेतकऱ्याच्या पदरी नेहमीच उपेक्षा आली. उपजीविकेचे एकमेव साधन असलेली शेती आणि त्यातूनच आलेल्या कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्या करण्यास धजावतो, तर काही वाममार्गाला लागतो. विदर्भातील शेतकऱ्यांच्या याच प्रश्नांचा वेध घेणारा ‘भाकर’ हा मराठी चित्रपट येऊ घातलाय. ‘तिरुपती बालाजी मोशन पिक्चर्स’ प्रस्तुत ‘वऱ्हाड चित्र’ निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन विजय पोहनकर यांनी केलंय.

‘जगाचा पोशिंदा जगाचा विनाशक झाला तर.. ‘ या टॅग लाईनवर बेतलेला ‘भाकर’ चित्रपट येत्या २३ मे ला राज्यात सर्वत्र प्रदर्शित होतोय. ‘महेंद्र पवनकुमार सिंह आणि टीम’ प्रस्तुत या चित्रपटाची सहनिर्मिती चंद्रशेखर पिंपळे, चंद्रकांत मेहेरे यांनी केली आहे. ‘भाकर’ हा चित्रपट म्हणजे विदर्भातील शेतकऱ्यांची जीवन जगण्याची कहाणी आहे. शेतकऱ्यांची होणारी फरपट, भौगोलिक परिस्थितीचा वेळेचा-काळाचा अभ्यास न करता येणारी पॅकेजेस, नैसर्गिक असमतोलता, आर्थिक फसवणूक, राजकारण यामुळे आत्महत्या करणारा शेतकरी तर दुसरीकडे त्याच्यातील तरून पिढी यातून बाहेर पडण्यासाठी वाईट मार्गाकडे वळते.. अशाच एका गावातील हताश तरुण एकत्र येतात व त्यांना साथ मिळते भाऊची. दोन पिढ्यांतील विचारांचा संघर्ष सुरु होतो. यातील एक गट नक्षलवादाकडे वळतो. वेगळ्या धाटणीची वास्तवदर्शी कथा या चित्रपटातून रेखाटण्यात आली आहे. शेतकऱ्यांना जगाचा पोशिंदा म्हणतो, तोच जर जगाचा विनाशक झाला तर.. आपल्या पोटाला ‘भाकर’ कोठून मिळणार. हा मध्यवर्ती विषय या सिनेमातून हाताळण्यात आला आहे.

किशोर कदम, नितीन भजन, आशुतोष भाकरे, जयेश शेवलकर, संजय कुलकर्णी, पूर्णिमा वाव्हळ यांच्या भूमिका असलेल्या या चित्रपटाचे लेखन दिग्दर्शक विजय सहदेव पोहनकर यांनी केलंय. छायाचित्रण राजा फडतरे यांनी केले असून संकलन दिनेश मेंगडे यांचे आहे. सौ. कविता पिंपळे लिखित यातील गीतांना रोहित नागभिडे यांनी संगीत दिले असून ज्ञानेश्वर मेश्राम, नंदेश उमप, मधुरा कुंभार या गायकांच्या सुमधूर स्वरात ही गीते ध्वनीमुद्रित करण्यात आली आहेत. मनोरंजनाच्या माध्यमातून एक गंभीर प्रश्न ‘भाकर’ सिनेमातून प्रेक्षकांसमोर मांडण्यात येत असून येत्या २३ मे ला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.

The post Bhakar to release on 23rd May 2014 appeared first on MarathiStars.

]]>
https://marathistars.com/news/bhakar-release-23rd-may-2014/feed/ 0 9168
Bhakar (2014) https://marathistars.com/movies/bhakar-2014/ https://marathistars.com/movies/bhakar-2014/#respond Wed, 30 Apr 2014 20:36:17 +0000 https://marathistars.com/?p=9169 Movie : Bhakar Producers : ​Chandrashekhar Pimple and Chandrakant More Director : Vijay Sahdev Pohankar Banner : Mahendra Pavankumar Singh and team Cast : ​Kishor Kadam, Nitin Bhajan, Ashutosh Bhakre, Jayesh Shevalkar, Sanjay Kulkarni, Poornima Wavhal Music : Kavita Pimple Genre : Social drama Release Date : May 23, 2014 Synopsis : The film is based […]

The post Bhakar (2014) appeared first on MarathiStars.

]]>
AmpedSense.OptimizeAdSpot('AP'); AmpedSense.OptimizeAdSpot('IL'); AmpedSense.OptimizeAdSpot('IR');
  • Movie : Bhakar
  • Producers : ​Chandrashekhar Pimple and Chandrakant More
  • Director : Vijay Sahdev Pohankar
  • Banner : Mahendra Pavankumar Singh and team
  • Cast : ​Kishor Kadam, Nitin Bhajan, Ashutosh Bhakre, Jayesh Shevalkar, Sanjay Kulkarni, Poornima Wavhal
  • Music : Kavita Pimple
  • Genre : Social drama
  • Release Date : May 23, 2014

Synopsis : The film is based on farmer suicides taking place in the Vidarbha region.


Bhakar Marathi Movie Still Photos/Poster :


Bhakar Marathi Movie

 


Bhakar Marathi Movie Theatrical Trailer/Promo :


The post Bhakar (2014) appeared first on MarathiStars.

]]>
https://marathistars.com/movies/bhakar-2014/feed/ 0 9169