The post Makrand Anaspure’s “Punha Gondhal Punha Mujra” appeared first on MarathiStars.
]]>राजकीय विडंबनावर भाष्य करणारा मराठी चित्रपट म्हटला की, ‘सिंहासन’ आणि ‘सामना’ या दोन चित्रपटांची आठवण मराठी रसिकांना व्हायची. मधल्या काळात राजकारणावर भाष्य करण्याचं विनोद हे सर्वात उत्तम साधन आहे हे लक्षात घेऊन 2009 मध्ये रपेरी पडदयावर ‘गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा’ हा राजकीय व्यंगावर भाष्य करणारा धमाकेदार चित्रपट आला. 25 वेळा पाहिला तरी प्रेक्षकांना परत परत पहावासा वाटणारा हा चित्रपट सुपरहिट ठरला. चित्रपटाला मिळालेला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद आणि यशामुळे आता तितक्याच जोमाने आणि तयारीनिशी या चित्रपटाचा सिक्वल येऊ घातलाय. सर्वसामान्यांना आवडेल त्यासोबतच विचारवंतांनाही भावेल अशा वास्तवदर्शा कथानकावर ‘पुन्हा गोंधळ पुन्हा मुजरा’ हा मराठी चित्रपट असणार आहे.
‘सिध्दिविनायक इंटरनॅशनल फिल्मस्’ निर्मितीसंस्थेचे निर्माते नविन सिंग आणि राकेश भोसले यांनी ‘पुन्हा गोंधळ पुन्हा मुजरा या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा उचलली असून बाळकृष्ण शिंदे चित्रपटाचे दिग्दर्शन करीत आहेत. ‘गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा’ या चित्रपटातील पॉलिटिकल कॉमेडी लोकांना भावली. सत्तेच्या हव्यासासाठी, प्रतिष्ठा जपत संधी साधणारे राजकारणी, आमदारकी मिळविण्यासाठी गावपातळीवर त्यांचे चालणारे कट- कारस्थानाचे खेळ प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे ठरले. नारायण वाघ आणि विश्वासराव टोपे यांच्या पारंपारिक शत्रुत्वाची कथा आता पुढील मंत्री पदासाठी रंगणार आहे.
मकरंद अनासपुरे व सयाजी शिंदे यांच्या मध्यवर्ता भूमिका असलेल्या या चित्रपटातून अलोक नाथ प्रथमच मराठी चित्रपटात पदार्पण करताहेत. ज्येष्ठ साहित्यिक आणि कादंबरीकार रंगनाथ पाठारे प्रथमच या चित्रपटात एका वेगळ्या भूमिकेत दिसतील. सोबत डॉ.विलास उजवणे, शरद शेलार, डॉ. सुधीर निकम, सिध्देश्वर झाडबुक्के, स्वप्नील राजशेखर, पुर्णिमा अहिरे, विनोद खेडकर आणि परदेशी अभिनेत्री सेरेना यांच्या भूमिका आहेत. चित्रपटाची सिनिमॅटोग्रफी सुरेश सुवर्णा करणार असून कला दिग्दर्शन संदीप इनामके यांचे आहे. या चित्रपटाची मुंबईत चित्रीकरणाने सुरवात करण्यात आली आहे.
The post Makrand Anaspure’s “Punha Gondhal Punha Mujra” appeared first on MarathiStars.
]]>