Rupkumar Rathod Archives - MarathiStars https://marathistars.com/tag/rupkumar-rathod/ Marathi Actress Wallpapers,Photos,Images,tv Serial Actress,Photos, Mon, 28 Oct 2013 11:17:02 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.6.2 Raj Thackeray Launch Marathi Music Album “Tuza Abola” https://marathistars.com/news/raj-thackeray-launch-marathi-music-album-tuza-abola/ https://marathistars.com/news/raj-thackeray-launch-marathi-music-album-tuza-abola/#respond Mon, 28 Oct 2013 11:15:50 +0000 https://marathistars.com/?p=6444 प्रेमातील तरल भावनांचा म्युझिक अल्बम ‘तुझा अबोला’ मा. श्री. राजसाहेब ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशित संगीतातील बदलता ट्रेंड आणि काव्यातला हळूवार भाव यांचा सुवर्णमध्य साधणं हे गीतकार -संगीतकारांसाठी नेहमीच एक आव्हान असतं. आज मराठी संगीतात नवनवीन प्रयोग होत असून ते ऐकणाराही फार मोठा श्रोता वर्ग पहायला मिळतो. चित्रपट संगीतासोबतच नॉनफिल्मी गीतांना तरणाईकडून नेहमीच मनमुराद दाद मिळते. […]

The post Raj Thackeray Launch Marathi Music Album “Tuza Abola” appeared first on MarathiStars.

]]>
AmpedSense.OptimizeAdSpot('AP'); AmpedSense.OptimizeAdSpot('IL'); AmpedSense.OptimizeAdSpot('IR');

प्रेमातील तरल भावनांचा म्युझिक अल्बम ‘तुझा अबोला’

मा. श्री. राजसाहेब ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशित

संगीतातील बदलता ट्रेंड आणि काव्यातला हळूवार भाव यांचा सुवर्णमध्य साधणं हे गीतकार -संगीतकारांसाठी नेहमीच एक आव्हान असतं. आज मराठी संगीतात नवनवीन प्रयोग होत असून ते ऐकणाराही फार मोठा श्रोता वर्ग पहायला मिळतो. चित्रपट संगीतासोबतच नॉनफिल्मी गीतांना तरणाईकडून नेहमीच मनमुराद दाद मिळते. आजच्या लोकप्रिय गायकांच्या स्वरांनी सजलेला ‘तुझा अबोला’ हा नवा मराठी प्रेमगीतांचा अल्बम आणि ‘हदयातील एक हळूवार कोपरा’ हा कवितासंग्रह ‘संजीवनी एण्टरटेन्मेण्ट’च्या वतीने प्रकाशित करण्यात आला आहे.

Tuza Abola Marathi Music Album Launch
Tuza Abola Marathi Music Album Launch

गीतकार संजय शिवराम चव्हाण लिखित ‘तुझा अबोला’ मधील गीतांना ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांच्या सुरेल संगीताची साथ लाभली आहे. सुरेश वाडकर, रुपकुमार राठोड, देवकी पंडीत, बेला शेंडे, ऋषिकेश रानडे या नामांकित गायकांसोबत आकांक्षा पालकर या नवोदित गायिकेच्या गीताचा यात समावेश आहे. माननीय श्री. राजसाहेब ठाकरे यांच्या हस्ते या अल्बमचे आणि कविता संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले असून मा. आमदार श्री. बाळा नांदगांवकर, ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की, मा.श्री. किरण शांताराम, आमदार श्री. प्रमोद जठार, संगीतकार निलेश मोहरीर, दिग्दर्शक केदार शिंदे आदी अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. 60-70 च्या दशकातील मराठी गाण्याचा सुवर्णकाळ पुन्हा निर्माण करण्याचा ‘तुझा अबोला’ मधून प्रयत्न करण्यात आला आहे. प्रेमातील तरल भावनाची स्पदंन टिपणारा हा अल्बम आजच्या युवा पिढीला नक्कीच आवडेल असा आहे.

संजय शिवराम चव्हाण प्रस्तुत ‘तुझा अबोला’या अल्बममध्ये 8 विभिन्न छटा असलेल्या प्रेमगीतांचा आस्वाद प्रेक्षकांना घेता येणार आहे. ‘तुझा अबोला असहय सजणी’ आणि ‘तुझ पाहता समोरी’ ही विरह आणि मिलनाची दोन वेगळ्या भावछटा असणारी गीते सुरेश वाडकर यांनी गायली आहेत. ‘गोड गुलाबी गारव्यात या’, ‘तुझ्याच कंठी बंदिशी सा-या’ या गीतांना देवकी पंडीत यांचा सुमधूर स्वर लाभला असून ‘हया ह्दयीच्या आर्त स्वरा रे’ हे गीत बेला शेंडेनी तितक्याच उत्कटपणे गायले आहे. ‘तुझा अबोला’ अल्बममधील ‘सखे चांदणे आज छळते नभीचे’ हे गीत ऋषिकेश रानडे यांनी तर ‘वाळूत रेखाटले जे’ हे गीत रपकुमार राठोड यांनी गायले आहे. ‘मी मलाच हरवून बसले रे’ हे गीत आकांक्षा पालकर यांच्या आवाजात आहे. तरणाईला जे हवं आहे ते देण्याच्या प्रयत्नातही गाण्यातलं मराठीपण टिकवण्याचा आणि आपल्या मातीचा दरवळ जपण्याचा प्रयत्न ‘तुझा अबोला’ मधून करण्यात आला आहे. प्रेमात पडलेल्या प्रत्येकालाच ही गीते संग्रही ठेवावीशी वाटतील अशी आहेत. ‘संजीवनी एण्टरटेन्मेण्ट’च्या वतीने र. 130 इतक्या माफक दरात ‘तुझा अबोला’ हा अल्बम उपलब्ध करण्यात आली

The post Raj Thackeray Launch Marathi Music Album “Tuza Abola” appeared first on MarathiStars.

]]>
https://marathistars.com/news/raj-thackeray-launch-marathi-music-album-tuza-abola/feed/ 0 6444