Fekamfaak Marathi Movie Archives - MarathiStars https://marathistars.com/tag/fekamfaak-marathi-movie/ Marathi Actress Wallpapers,Photos,Images,tv Serial Actress,Photos, Thu, 11 Jul 2013 07:07:32 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.6.2 भरतचा ‘फेकमफाक’ लवकरच येत आहे तुम्हाला हसवायला !! https://marathistars.com/news/fekamfaak-marathi-movie-to-release-soon/ https://marathistars.com/news/fekamfaak-marathi-movie-to-release-soon/#respond Fri, 21 Jun 2013 19:19:59 +0000 https://marathistars.com/?p=4579 मराठी चित्रपटजगताचा ‘सुपरस्टार’ भरत जाधव हा ‘फेकमफाक’ हा आणखी एक नवा चित्रपट घेऊन जुलैमध्ये आपल्या भेटीस येतोय! ‘एमईएफएसी प्रॉडक्शन्स’ या निर्मिती संस्थेचा हा पहिलाच चित्रपट कॉमेडी थ्रिलर आहे, ‘ फेकमफाक’ या चित्रपटात भरतबरोबरच विजय चव्हाण आणि विजू खोटे ही गाजलेली विनोदी दुक्कल आहे. या तिघांच्या विनोदानं प्रेक्षक खळखळून तर हसतीलच; पण त्याचवेळी चित्रपटातील रहस्य आणि […]

The post भरतचा ‘फेकमफाक’ लवकरच येत आहे तुम्हाला हसवायला !! appeared first on MarathiStars.

]]>
AmpedSense.OptimizeAdSpot('AP'); AmpedSense.OptimizeAdSpot('IL'); AmpedSense.OptimizeAdSpot('IR');

मराठी चित्रपटजगताचा ‘सुपरस्टार’ भरत जाधव हा ‘फेकमफाक’ हा आणखी एक नवा चित्रपट घेऊन जुलैमध्ये आपल्या भेटीस येतोय! ‘एमईएफएसी प्रॉडक्शन्स’ या निर्मिती संस्थेचा हा पहिलाच चित्रपट कॉमेडी थ्रिलर आहे, ‘ फेकमफाक’ या चित्रपटात भरतबरोबरच विजय चव्हाण आणि विजू खोटे ही गाजलेली विनोदी दुक्कल आहे. या तिघांच्या विनोदानं प्रेक्षक खळखळून तर हसतीलच; पण त्याचवेळी चित्रपटातील रहस्य आणि थरार उलगडूनदाखवताना कथेने घेतलेली वळणं बघून त्यांना एकापाठोपाठ एक धक्केही बसत राहतील.

दयानंद राजन या बॉलीवुड गाजवणार्‍या दिग्दर्शकाचे मराठी चित्रपटसृष्टीतील हे पदार्पण असून ‘फेकमफाकक’च्या दिग्दर्शनाबरोबरच लेखनाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली आहे. हसते खेलते, अतीत, गिरफ्त, रातरानी आणि हसीनो का मेला हे दयानंद राजन यांनी दिग्दर्शित केलेले चित्रपट आजही रसिकांच्या स्मरणात आहेत. चित्रपटात एकूण चार गीते असून, सध्या गाजत असलेले ‘आयटम साँग’ मराठीतील वैशाली सामंतने  गायलेलं आहे. शिवाय, बॉलीवुडमधील शान आणि साधना सरगम यांनी अन्य गीतांना स्वर देऊन या चित्रपटाच्या आकर्षणात भर घातली आहे.

भरत बलवली या उमद्या गायक कलावंतानं ‘फेकमफाक’च्या संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. या चित्रपटात आपल्याला ज्येष्ठ कलावंत अमिताभ बच्चन यांचा आवाजही ऐकायला येतो! पण तो स्वर अर्थातच सुदेश भोसले यांचा आहे… त्यांनी या चित्रपटात अमिताभ यांच्याबरोबरच आणखी चार जणांचे आवाज आपल्याला ऐकवले आहेत.

‘फेकमफाक’ही गोपीनाथ देसाई या मस्ती, मजा, धमाल करणार्‍या गमत्या विक्रेत्याची कहाणी आहे. हातात काहीच नसताना, त्यातून काही तरी गमतीदार उभं करून दाखवणारा असा हा विक्रेता आहे. रोजच्या दैनंदिन वापरासाठी लागणार्‍या ग्राहकोपयोगी वस्तू विकणारा हा गोपी आपल्या परिसरात सर्वांचा आवडता आहे. गोपीचे वडील श्रीकांत देसाई हे गिरणी कामगार आहेत आणि आई सुलोचना व बहीण हेमा… असं हे चौघांचं प्रेमाच्या भावनांनी बांधलेलं कुटुंब आहे.

चित्रपटाची नायिका स्नेहा ही गोपीची प्रतिस्पर्धी! कारण ते दोघेही एकाच एजन्सीमध्ये ‘सेल्समन’ म्हणून काम करत असतात. स्नेहा ही घरातली लाडावलेली मुलगी आणि तिचं रोजच गोपीशी वाजत असतं! पण एका छोट्याशा मस्करीतून पुढे एक विदारक सत्य गोपीपुढे उभं ठाकतं आणि कहानी नया मोड लेती हैं..

येत्या जुलै मध्ये हा चित्रपट आपल्या भेटीस येत आहे.

The post भरतचा ‘फेकमफाक’ लवकरच येत आहे तुम्हाला हसवायला !! appeared first on MarathiStars.

]]>
https://marathistars.com/news/fekamfaak-marathi-movie-to-release-soon/feed/ 0 4579
Fekamfaak Marathi Movie Cast Story Photos https://marathistars.com/movies/fekamfaak-marathi-movie-cast-story-photos/ https://marathistars.com/movies/fekamfaak-marathi-movie-cast-story-photos/#respond Sun, 23 Dec 2012 08:17:12 +0000 https://marathistars.com/?p=1729 Produced by : Me Fac production Director : Dayanand Rajan Writer : Dayanand Rajan Star Cast : Bharat Jadhav, Ruchita Jadhav, Viju Khote, Akshaya Gurav, Sanjivani Jadhav, Vijay Chavan, Mangesh Desai Release Date  : January 2013 Genre : Comedy Film Plot Outline : चाळीतल्या आपल्या घरात एक बहिण आणि आईवडिलांसोबत गोपीचं समाधानकारक आयुष्य सुरु आहे… […]

The post Fekamfaak Marathi Movie Cast Story Photos appeared first on MarathiStars.

]]>
AmpedSense.OptimizeAdSpot('AP'); AmpedSense.OptimizeAdSpot('IL'); AmpedSense.OptimizeAdSpot('IR');

Produced by : Me Fac production
Director : Dayanand Rajan
Writer : Dayanand Rajan
Star Cast : Bharat Jadhav, Ruchita Jadhav, Viju Khote, Akshaya Gurav, Sanjivani Jadhav, Vijay Chavan, Mangesh Desai
Release Date  : January 2013
Genre : Comedy Film

Plot Outline : चाळीतल्या आपल्या घरात एक बहिण आणि आईवडिलांसोबत गोपीचं समाधानकारक आयुष्य सुरु आहे… घरोघरी जाऊन सेल्समनचा व्यवसाय करणाऱ्या गोपीला त्याचीच प्रतिस्पर्धी स्नेहा भेटते आणि मग सुरु होतो एक उंदरा-मांजरीचा पाठशिवणीचा खेळ… दरम्यान त्यांच्या आनंदी आयुष्यात अशा काही घटना घडत जातात त्यामुळे त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळते… आणि सुरु होतो नवा डाव…

‘फेकमफाक’ करणाऱ्या गोपीच्या आयुष्यात नेमकं काय घडतं, स्नेहा त्या प्रकरणात कशी गुंतत जाते, गोपीच्या कुटुंबियांच नेमकं काय होतं आणि गोपी या सगळ्यातून स्वताची सुटका कशी करून घेतो याचा सुरस प्रवास पहायचा असेल तर ‘फेकमफाक’ रिलीज झाल्यावर चित्रपटगृहाला भेट द्यायलाच हवी…

Description : गोपी देसाई, लहानशा पण सुखी, प्रेमळ आईवडिलांच्या सहवासात वाढलेला… हसतखेळत आयुष्य जगणारा… एक सदाबहार व्यक्तिमत्व… निव्वळ करमणूक म्हणून ‘फेकमफाक’ करण्याचा गोपीला जगावेगळा छंद… पण हीच ‘फेकमफाक’ एके दिवशी कशी अंगलट येते आणि गोपी त्यातून कसा मार्ग काढतो याची ही सुरस कथा म्हणजे “फेकमफाक”…

Photos / Posters :

 

 

The post Fekamfaak Marathi Movie Cast Story Photos appeared first on MarathiStars.

]]>
https://marathistars.com/movies/fekamfaak-marathi-movie-cast-story-photos/feed/ 0 1729