Khairlanjichya Mathyavar – Marathi Film On Khairlanji massacre

समाजात काही विचित्र अशा घटना घडतात ज्याने माणसाचे मन अक्षरशः हेलावून जाते, सुन्न व्हायला होते, परंतू अशा क्रौर्य स्करपाच्या घटना घडल्यानंतर त्याची पुनरावृत्ती होउ नये असे वाटत असतांनाच दिल्ली गँग रेप, मुंबईतील बलात्कार घटना घडतात… अशीच एक मानवी प्रवृततीला काळीमा फासणारी घटना 29 सप्टेंबर 2006 रोजी भंडारा जिल्हयातील खैरलांजी गावांत घडली होती, त्या घटनेवर आधारित राजू मेश्राम लिखित आणि दिग्दर्शित मराठी चित्रपट खैरलांजीच्या माथ्यावर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे.

के.एस. क्रिएशन्स निर्मितीसंस्थेअंतर्गत पदमश्री कल्पना सरोज यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटांत किशोरी शहाणे, अनंत जोग, मिलिंद शिंदे, डॉ.विलास उजवणे, डॉ.संदीप पाटील, आणि धाडसी भूमिकेत प्रतिक्षा मुणगेकर इ. कलावंत आहेत. चित्रपटाला आनंद मोडक यांचे संगीत आहे तर चित्रपटातील गाणी अजय अतुल आणि रंविद्र साठे यांनी गायली आहेत.

लेखक – दिग्दर्शक राजू मेश्राम चित्रपटाविषयी सांगतात की, आज सर्व समाज प्रगत झाला, तंत्रज्ञान प्रबळ झाले, इंटीनेटच्या माध्यमातून आपण एका क्षणात जगाच्या कोणत्याही कोपर्‍यात पोहचू शकतो, एकीकडे आपण मंगळावर जाण्याच्या गोष्टी करतोय पण आपली मानसिक परिस्थिती अजून बदललेली नाहीच.. म्हणून मला आज इतक्या वर्षानंतरही या घटनेवर चित्रपट करावासा वाटला, त्याचे अजून एक कारण म्हणजे सिनेमा सारखे दुसरे प्रभावी माध्यम नाही. विचार करायला भाग पाडणारा विषय हाताळावासा वाटला, चित्रपटातून आम्ही इतकेच सांगू इच्छितो की, माणूस कोणत्याही जाती धर्माचा असो, परंतू त्याने प्रत्येक माणसाला एक माणूस म्हणूनच पहावे, सामंजस्याने रहावे, प्रेमाने रहावे. चित्रपट सत्य घटनेवर असला तरी सिनिमॅटिक लिबर्टी घेत पात्रांची नावे, स्थळ, वेळ, काळ बदललेली असली तरी कथानक तेच आहे. माणसाला आजही करुणेची आवश्यकता आहे, त्यामुळे क्रौर्य कमी होईल वा त्याला काही प्रमाणात प्रतिबंध लागेल.

किशोरी शहाणे मुख्य भूमिकेत असून त्यांनी या व्यक्तिरेखेसाठी खूप अभ्यास केला आहे, व्यक्तिरेखेची भाषा आणि राहणीमान यांवर त्यांना खूप मेहनत घ्यावी लागली आहे. नवोदित प्रतिक्षा मुणगेकर या अभिनेत्रीवर चित्रित झालेली दृश्ये अंगावर काटा आणणारी आहेत..

Image Courtesy – Times Of India.

Tags

khairlanji cha mathyavar marathi movie, Kherlanjichya Mathyavar,